महाराष्ट्र

​”सातारकर टँकरखाली अन् पोलीस वसुलीत? राधिका रोडवरील भीषण अपघाताने वाहतूक शाखेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!”

​"तळीरामांची सोय की वाहतुकीची दैना? राधिका रोडवर मृत्यूचा टँकर आडवा होईपर्यंत पोलीस हप्ते.. सॉरी, ड्युटीत व्यस्त होते का?"

प्रतिनिधी (अजित जगताप) : साताऱ्यात राधिका रस्त्यावर दारू दुकानासमोरच पाण्याच्या टँकर झाला आडवा.सातारा शहरातील गजबजलेल्या राधिका रस्त्यावर सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. तरीही वार्षिक यात्रा आणि इतर कारणांमुळे दारूच्या दुकानासमोर गर्दी होत आहे. या गर्दीतून वाट काढत पुढे जात असतानाच दारूच्या दुकानात समोर पाणीदार टँकर आडवा झाल्याने काही काळ वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली होती. अखेर अर्ध्या तासाने ट्रेनच्या साह्याने टँकर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

याबाबत माहिती ची माहिती अशी की, सध्या वार्षिक यात्रा असल्यामुळे या भागातील दोन दारूच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये दारू घेऊन जाण्यासाठी अनेकांची वाहने रस्त्यात लावली जातात. दारू सोबत चकना लागतो. तशा पद्धतीने अनधिकृत टपऱ्या रस्त्यावरच आहे. या ठिकाणी नेहमी वाहतूक अडथळे होतात. आज सकाळी एक खाजगी पिण्याच्या पाण्याचा टँकर वाहतूक करणारा टॅंकरच आडवा झाला. त्यामुळे दारू दुकानासमोर पाण्याचा टँकर आडवा झाल्याने ही गंमत जंमत चांगलीच चर्चेचा विषय झालेली आहे. वाहतूक पोलिसांच्या विशाल मनामुळे या ठिकाणी कधीही यंत्रणा कार्यरत राहत नाही.

एखाद्या व्यक्ती रस्त्यात वाहन लावून दुकानात गेली तर त्याच्यावर कारवाई होत नाही. मात्र मात्र, एखादी व्यक्ती दूध घेण्यास किंवा देवीच्या दर्शनासाठी रस्त्यावर वाहन लावून गेल्यास हे वाहन उचलले जाते. अशी ही चर्चा अनेकदा ऐकण्यात आलेली आहे प्रत्यक्षात मात्र सातारा शहरातील अनेक दारू दुकानासमोर वाहन पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे याबाबत कोणी चर्चाही करत नाही. वाहतूक पोलीस व्यवस्था येथील वाहने उचलून घेऊन जात नाहीत. असा दयाळूपणा इतर ठिकाणी दाखवावा. अशी मागणी होऊ लागलेली आहे.

राधिका रोडवर पाण्याचा टँकर आडवा झाला असला तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कडक उन्हाळ्यमुळे टँकर चाकाचा टायर शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजताच रस्त्यावरच फुटल्यामुळे चालकाचा वाहनांवरील ताबा सुटल्या असे प्रथमदर्शनेने सांगितले. दारू दुकानासमोरच पाण्याचा टँकर आडवा होण्याचे हा योगायोग समजावा. परंतु दारूपेक्षा पाणी सुद्धा उन्हाळ्यात महत्त्वाचे आहे हा मात्र संदेश देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button