डॉ. तेजश्री निरंजन शेवते यांना पीएच.डी. पदवी प्रदान.

सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, वऱ्हे, सातारा येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. तेजश्री निरंजन शेवते यांना MATS विद्यापीठ, रायपूर, छत्तीसगड यांच्याकडून संगणक शास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
त्यांनी “Enhancing IoT Device Security Through Optimization with Machine Learning-Based Technique” या विषयावर संशोधन केले. इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) उपकरणांची सुरक्षा वाढविण्यासाठी मशीन लर्निंग आणि ऑप्टिमायझेशन तंत्रांचा वापर करून प्रभावी घुसखोरी शोध प्रणाली विकसित करण्यावर त्यांच्या संशोधनाचा भर होता. वाढत्या सायबर धोक्यांच्या पार्श्वभूमीवर IoT उपकरणांची सुरक्षा अधिक सक्षम करणे हा या संशोधनाचा प्रमुख उद्देश आहे.
या संशोधनासाठी त्यांना मार्गदर्शक डॉ. सुनीता कुशवाहा, तसेच सहमार्गदर्शक डॉ. बलेंद्र गर्ग आणि डॉ. आर. डी. कुंभार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल संस्थेचे संचालक डॉ. बी. एस. सावंत, आणि सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व संशोधन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



