Uncategorized

सातारा नगरपरिषदेस कूपर कॉर्पोरेशनकडून सीएसआर अंतर्गत ट्रॅक्टर प्रदान.

सातारा नगरपरिषदेस कूपर कॉर्पोरेशनकडून सीएसआर अंतर्गत ट्रॅक्टर प्रदान.

सातारा : शहरातील स्वच्छता व विकासकामांना अधिक गती देण्यासाठी कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि., सातारा यांच्या सीएसआर निधीतून सातारा नगरपरिषदेस ट्रॅक्टर प्रदान करण्यात आला. या ट्रॅक्टरचे लोकार्पण समारंभ उत्साहात पार पडला.
या प्रसंगी कूपर कॉर्पोरेशनचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर श्री. फरोख कूपर तसेच डायरेक्टर श्री. जाल कूपर यांच्या हस्ते माननीय नगराध्यक्ष श्री. अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर यांना ट्रॅक्टरची चावी सुपूर्द करण्यात आली. यावेळी माननीय नगराध्यक्ष यांनी श्रीफळ वाढवून ट्रॅक्टर चे पूजन केले.

कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष श्री. अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर यांनी श्री. फारुख कूपर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आभार मानले. तसेच कूपर कॉर्पोरेशनच्या वतीनेही नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष श्री. अमोल मोहिते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कूपर कॉर्पोरेशन नेहमीच सातारा शहरासाठी मदतीचा हात पुढे करत आले आहेत. कोणत्याही वेळी मदतीची विनंती केली असता ‘नाही’ हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसतो. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी सातत्याने शहराच्या विकासासाठी सहकार्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास कूपर कार्पोरेशन प्रा. लि.चे डायरेक्टर असलम फरास आर्थिक दुर्बल घटक समितीचे सभापती श्री. संकेत साठे, , सातारा नगरपरिषदेचे वृक्ष विभागाचे प्रमुख श्री. दिग्विजय गाढवे तसेच कूपर कार्पोरेशनचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

सीएसआरच्या माध्यमातून मिळालेला हा ट्रॅक्टर सातारा शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेली झाडे तसेच रोड डिव्हायडर मधील झाडे यांना पाणी घालणे कामी विशेष बाब म्हणून उपयुक्त ठरणार आहे.यामुळे नगरपरिषदेच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता येणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button