महाराष्ट्र

पार्किंग नाही, माणुसकी नाही; साताऱ्यातील हॉस्पिटलचा धंदा की दुकानदारी? श्री. रमेश उबाळे यांचा जळजळीत सवाल!”

"साताऱ्यातील हॉस्पिटलच्या इमारतींचे ऑडिट करा, अन्यथा रस्त्यावर उतरू; रिपब्लिकन सेनेचा इशारा!"

आजची आंबेडकर जयंती…”साई अमृत हॉस्पिटल, सातारा”,,, अतिशय भयानक सत्य परिस्थिती स्वअनुभवातून……आज 14 एप्रिल पोलीस भरती, आर्मी भरती, एमपीएससी परीक्षा पुस्तक वाटप व भोजन व्यवस्था पाणी वाटप कार्यक्रमासाठी बाहेर पडत असतानाच माझा भाचा धावत पळत माझ्याकडे आला. मामा माझी आजी गेली आई खाली रडत आहे, तुम्ही पटकन आईला घेऊन साई अमृत हॉस्पिटल ला जावा ते ऐकून मला जबरदस्त धक्का बसला मी निशब्द होऊन त्याच्या चेहऱ्याकडे बघत होतो. आलोच पाच मिनिटात असे म्हणेपर्यंत माझ्या मेहुण्याची बायको तिथे आली. प्लीज पटकन चला साई अमृत हॉस्पिटलला माझी आई गेली. आम्ही घरातून निघालो हॉस्पिटल जवळ पोहोचलो. तिथे टू व्हीलर व फोर व्हीलर दोन्ही बाजूंना लागलेल्या मध्येच एक गाडी उभी होती. मी मोठ्याने ओरडलो ,वॉचमनला बडबडलो अरे गाड्या काढा. तो म्हणाला साहेब तुम्हीच तुमची गाडी आहे अशी माघारी घेऊन जावा. इथं गाडी लावायला जागा नाही.

मी म्हटलं हॉस्पिटलचा पार्किंग असेल की त्यावर तो म्हणाला, बाहेरच गाड्या लावतात. इथं हॉस्पिटलला पार्किंग नाही. त्या रागाच्या भरात मी बडबडलो मग हॉस्पिटल काढले कशाला? पण प्रसंग दुःखाचा असल्या कारणाने मी संयम ठेवत तिथून हॉस्पिटलमध्ये निघालो. बाहेर चप्पल काढण्याचे स्टॅन्ड होते. डाव्या हाताला छताला हिरवं बांधलेलं कापड… बसायला असलेले तीन बाक,,, उन्हामध्ये घामाघुम असलेले पेशंटचे नातेवाईक चिंताग्रस्त अवस्थेत बसले होते..तर काही जण बसायला जागा नसल्यामुळे उभे राहिले होते. हात जोडून आम्हाला आमच्या नातलगाला बघायला जायचं आहे. जणू काय एखादा भिकारी भीक मागण्यासाठी दारात उभा आहे. मी तसाच आत गेलो,,, माझ्या पाठीमागून दोन महिला धावत आल्या. तुम्ही आत जाऊ शकत नाही मी त्यांना विनंती केली कुलकर्णी आडनावाच्या आमच्या पेशंट ऑफ झाल्या आहेत. मला जाऊ द्या त्यावर समोर असणाऱ्या नर्सनी इथे पेशंटची बॉडी आहे. असं सांगितलं. मी शांत पणे गेलो पाहिलं, वार्डमधील डॉक्टरांना भेटलो.लगेच त्यांनी एक कागद दिला व ही माहिती भरा.

मृत व्यक्तीचं नाव, तिचा पत्ता, तिच्या आई-वडिलांचे नाव, त्यांचा पत्ता,पतीचे नाव, त्यांचा पत्ता, आधार कार्ड नंबर व्यवसाय व बरीच माहिती ही प्रोसिजर आहे ही पूर्ण केल्यानंतर बॉडी आपल्या ताब्यात मिळेल . सकाळी साडेदहा वाजता त्यांना ऍडमिट केलं होतं. मला डॉक्टरांनी त्यांची फाईल रिसेप्शनिस्ट टेबल वरती तयार करा असे सांगितले. तिथेही सेम माहिती भरायची होती. ती माहिती दिली. तीन तास झाले… दीड वाजला होता…. तरीसुद्धा प्रोसिजर पूर्ण झाली नाही उलट आतून निरोप आला तुम्ही बाहेरील डॉक्टर कडून डेट सर्टिफिकेट घ्या व नगरपालिकेला जमा करा दुसऱ्यांदा मी शॉक झालो तीन तास लावले फक्त हे सांगायला की तुम्ही तुमचा मृत व्यक्ती हॉस्पिटलला नोंद न करता परस्पर घेऊन जावा.

मला काही सुद्धा सुधारले नाही कारण गेले तीन तास उघड्या डोळ्यांनी हे हॉस्पिटल, या हॉस्पिटल मधील स्टाफ त्यांचं पेशंटच्या नातेवाईकांशी असणारा मुजोर वागणं निमुटपणे सहन करून डोळ्यांमध्ये व मनामध्ये भरण्याचं काम माझं चालू होतं. आता माझा संयम संपला मी पुन्हा त्या डॉक्टर कडे गेलो आणि विचारलं काय झालं त्या म्हणाल्या डॉक्टर जरग यांनी सांगितला आहे पेशंट घेऊन जायला मी म्हणलं हॉस्पिटलची प्रोसिजर नाही. त्याची काही गरज नाही तुमचा तुम्ही नगरपालिकेतून मृत्यूचा दाखला काढून घ्या… मग केवळ हे सांगायला तीन तास कशासाठी बसवलं होतं ?भर उन्हात डोक्यातून घामाच्या धारा वाहत,,, आठ ते दहा लोक वाट बघत बसलेत की त्यांना घरी नेऊन ,,,थोड्या वेळाने अंत्यविधी पूर्ण करता येईल आता पुन्हा पहिले पाढे पंचावन्न करण्यासाठी आपण म्हणत आहात,,, तुमचं तुम्ही बघा हे योग्य नाही हा अन्याय आहे.. त्यानंतर माझ्यातील ओरिजनल चळवळीतला कार्यकर्ता जागा झाला..

दहा मिनिटात त्याने हॉस्पिटल हादरवले मोठ्या आवाजात बोलून न्यायासाठी लढण्याची भूमिका घेतली.. त्यावेळेस मात्र दहाच मिनिटात सर्व प्रोसिजर पूर्ण झाली… हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स ने मृत व्यक्तीस त्याच्या घरी सोडण्यास आले. हे एका सर्वसामान्य माणसाचे दुःख मी सांगितलं. पण दहा मिनिटात ला तो दुसरा माणूस वेगळा होता तो एक राजकीय नेता होता. तो एक बिझनेस मॅन होता. तो एक समाजसेवक होता. त्याला दहा मिनिटात न्याय मिळाला पण सर्वसामान्य माणसाचं काय? त्याला वाली कोण आहे ?त्याला न्याय कोण मिळवून देणार? हा प्रश्न आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला 14 एप्रिलला पूर्ण दिवस डोक्यात घर करून बसला. आता मुख्य मुद्द्याकडे साई अमृत हॉस्पिटल धंदा व्यवसाय की दुकानदारी….

1) या हॉस्पिटलचा प्लॅन मंजूर केलेल्या अधिकाऱ्यास निलंबित केलं पाहिजे.

2) पार्किंग व्यवस्था नसलेल्या हॉस्पिटलला मान्यता कशी?

3) पार्किंगच्या जागेत कॅन्टीन चालू शकते का?

4) तळमजला ऑफिस मंजूर आराखड्यातील इतर मजल्यांमध्ये स्वेच्छेने वाढवलेले मजले यावरती नगरपालिकेचे नियंत्रण आहे का? मंथली पाकीट चालू असल्याने या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते का???

5) हॉस्पिटल नियमाप्रमाणे इमारतीच्या चारी बाजूंनी फायर ची गाडी फिरली पाहिजे त्यासाठीच प्लॉटमध्ये बांधकाम करत असताना साईड मार्जिन सोडलेल्या आहे का??? फायर नियमांमध्ये साताऱ्यातील किती हॉस्पिटल बसतात???

6) हे हॉस्पिटल निवासस्थान असलेल्या बिल्डिंग मध्ये आहे, हे भाडे तत्त्वा वरती घेतलेली जागा आहे, याला सातारा नगरपालिकेने हॉस्पिटल साठी मान्यता दिलेली आहे का???

7) सातारा शहरा मध्ये ट्रे सिस्टीम, पेशंट व नातेवाईक यांच्यात कमीत कमी संवाद साधला जाईल , नातेवाईका वरती प्रेशर आणून मोठ्या प्रमाणात बिल काढण्यासाठी पुण्या मुंबईची स्टाईल सातारा हॉस्पिटल चे डॉक्टर्स लादत आहेत का??? यासाठी एक चौकशी समिती नेमली पाहिजे व सर्वसामान्य नागरिकांना न्याय दिला पाहिजे! हॉस्पिटल चे रेट कार्ड, हॉस्पिटल चे सर्व आजारावरील होणाऱ्या खर्चाचे दर औषधांचे दर हे जाहीर रित्या नातेवाईकांना सांगितले पाहिजेत खिंडीत अडवून नातेवाईकांचा कार्यक्रम करणाऱ्या हॉस्पिटल वरती कारवाई झालीच पाहिजे, की शासन प्रशासन यांना पाठीशी घालत आहे का??? याची चौकशी झाली पाहिजे.

8) सातारा नगरपालिका हद्दीतील सर्वच हॉस्पिटल मंजूर आराखड्यातील संक्शन केलेले बांधकाम व सर्व नेमावलीप्रमाणे सर्व एन ओ सी, तसेच पूर्णत्वाचे दाखले दिलेली कागदपत्रे याची फेर तपासणी व चौकशी झालीच पाहिजे, ज्यांनी हेराफेरी करून, मिठाईची पुढे व पैशाची पाकिटे देऊन दोन नंबरने मंजुरी घेतली असेल त्या सर्व हॉस्पिटल वरती व त्या सर्व अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अन्यथा रस्त्यावरचे आंदोलन संपूर्ण सातारा जिल्हा सहभागी होऊन आमच्यासोबत मैदानावरती उतरेल.

आजच्या एकंदरीत अनुभवाने माझ्या मनात पडलेले हे प्रश्न ज्यावेळेस आपण आपला जवळचा नातेवाईक घरातील सदस्य यावरती या प्रकारचा अन्याय होतो त्यावेळेस आपणाला सुद्धा असे अनुभव येतात का सातारा शहरातील एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आज मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे खासदार सातारा जिल्ह्याचे चार मंत्री आदरणीय पालकमंत्री यांना न्याय मागतोय खरंच सातारचे हॉस्पिटल सर्वसामान्य नागरिकां वरती अन्याय करून लुटत आहेत का जवाब दो जवाब दो आमदार खासदार मंत्री जवाब दो!!!

श्री. रमेश अनिल उबाळे.

पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष,

रिपब्लिकन सेना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button