महाराष्ट्र

जावलीच्या सभापती पदी सौरभ शिंदे तर उपसभापती पदी गोरख महाडीक पंचायत समितीवर भाजपचा झेंडा.

जावली पंचायत समितीच्या सभापतीपदी सौरभ शिंदे तर उपसभापती पदी गोरख महाडीक यांची निवड झाल्याने पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला.

जावली तालुका पंचायत समितीच्या होणाऱ्या सभापती निवडीकडे संपूर्ण तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही भाजपा तीन,शिवसेना दोन, व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एक असे पक्षीय बलाबल या सभागृहात आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादी व मित्र पक्षांनी एकत्र येत ही निवडणूक लढवली होती. स्पष्ट बहुमत अभावी जावली पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड अत्यंत रंजक अवस्थेत मध्ये पोहोचली.
सभापती, उपसभापती निवडीसाठी आज विशेष सभा सभागृहामध्ये पिठासन अधिकारी राजश्री मोरे, यांचे अध्यक्षतेखाली सभेचे सदस्य व सभागृहाचे सचिव तथा गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, तहसिलदार प्रविण मुगदुल, सपोनि सुधीर पाटील यांच्या उपस्थतीतीमध्ये सपन्न झाली.

सकाळी ११ नंतर दोन्ही पदसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. सभापती पदासाठी भाजपकडून सौरभ शिंदे तर सेना व मित्र पक्षाच्या कडून कुसुंबी गटाच्या पं.स. सदस्या सुनिता दुंदळे यांचा अर्ज दाखल झाला होता. तर उपसभापती पदासाठी भाजपकडून गोरख महाडीक तर सेनेकडून सुनिता दुंदळे असे अर्ज दाखल झाल होते. सुनिता दुंदळे यांनी उपसभापती पदाचा ऊर्ज माघारी घेतल्याने भाजपचे गोरख महाडीक बिनविरोध निवडून आले. सभापती पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये सौरभ शिंदे यांना तीन मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे सदस्या शिल्पा शिंदे यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने सुनिता दुंदळे यांना दोन मते मिळाली. या प्रक्रियेमध्ये भाजपचे सौरभ शिंदे हे बहुमताने विजयी झाले.

यापूर्वी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी ची सत्ता होती त्यावेळी सौरभ शिंदे यांनी उपसभापती पदाची धुरा यशस्वी सांभाळली होती. गोरख महाडीक पहिल्यांदाच निवडून आले आणि उपसभापती झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले सकाळपासूनच पंचायत समिती च्या कार्यालयात बसून होते. तर जावलीचे नेते वसंतराव मानकुमरे नाट्यमय घडामोडी च्या प्रयत्नात होते. भाजपचे अनेक पदाधिकारी तसेच सेनेचे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. काही तडजोडी शेवटपर्यंत चालू होत्या. मात्र काही नेत्यांनी चिठ्ठीवरच सभापतीची निवडणूक झाली पाहीजे अशी भूमिका घेतल्या मुळे अखेर मतदानावर प्रक्रिया पार पडली. आ. शशिकांतजी शिंदे सर्व घडामोडीकडे लक्ष ठेवून होते. तर सेनेचे अंकुश कदम कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून सुचना करत होते.

नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या या निवडणुकीत प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ राजेंद्र शिंदे- कुडाळ गण, सौ. चारुशीला पवार- सायगाव गण, गोरख महाडिक- खर्शी बारामुरे गण हे तीन सदस्य भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निवडून आले आहेत. म्हसवे गणातून सौ शिल्पा शिंदे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडून आल्या आहेत. कुसुंबी गणातून सौ सुनीता दूंदळे व आंबेघर तर्फ मेढा या गणातून अतीश कदम मुळ राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी असलेतरी वरिष्ठांच्या राजकिय तडजोडी मुळे शिवसेना चिन्हावर लढले. सर्वांनीच ताकद लावल्यामुळे हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले आहेत.

जावली पंचायतीच्या स्थापनेपासून काँग्रेस, एसू, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी सत्ता उपभोगली होती. बाबा महाराजांचे मुळे पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला आहे. निवनिर्वाचित सभापती सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडिक, यांचे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी जि.प. सदस्य वसंतराव मानकुमरे, जि.प. सदस्या जयश्रीताई गीरी, यांच्यासाह अनेक पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button