महाराष्ट्र

कराडमध्ये लोकप्रतिनिधींकडूनच संस्कारांची पायमल्ली; यशवंतरावांच्या स्मृतींसमोरच उभ्या केल्या गाड्या!

विचांरांचा वारसा की सत्तेचा माज? लोकप्रतिनिधींकडून स्व. यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींची अवहेलना.

स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदनाचे लोकप्रतिनिधी कडून पावित्र्य भंग छत्रपती शिवाजी महाराज महाराज राजस्व अभियानाच्या अनुषंगाने स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात तालुका प्रशासनाच्या वतीने कार्यक्रम सुरू आहे. यासाठी कराड दक्षिण व उत्तरचे सन्माननीय आमदार या कार्यक्रमाला हजर आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने त्यांनी घालून दिलेले संस्कार व संस्कृती नुसार चालणाऱ्या व संविधानिक पदावर असणाऱ्या आमदारासह लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पवित्र स्मृतीसमोरच आपली वाहने लावून आचार विचार संस्कृती व पवित्र स्मृतीची अवहेलना केली आहे.

याबाबत सोशल मीडियावर लोकप्रतिनिधींच्या वाहनांचे फोटो व्हायरल होताच त्या गाड्या काढण्यात आल्या मात्र बाकीच्या तिथेच होत्या. यावरून सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. हेच लोकप्रतिनिधी सर्वांना सांगत असतात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती परिसराचे पावित्र्य राखले जावे मात्र यांच्याकडूनच या गोष्टीचा भंग झाल्याने चर्चा तर होणारच. 1971 च्या लढ्यातील सहभागी रणगाडा व फायटर प्लेन या ठिकाणी तरुणांना सैन्य भरतीचे स्फूर्ती मिळावी या उद्देशाने या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत याचाही सारासार विचार लोकप्रतिनिधींनी करणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर शहरातील प्रीतीसंगम बाग, टाऊन हॉल, स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल व स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी प्रशासन व नगरपालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button