अजिंक्यतारा किल्ल्यावर पर्यटक २०० फूट दरीत कोसळला; ‘शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीम कडून थरारक बचावकार्य सुरू.
अजिंक्यतारा किल्ल्यावर पर्यटक २०० फूट दरीत कोसळला; 'शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीम कडून थरारक बचावकार्य सुरू.

सातारा: ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्यावर आज एक भीषण अपघात घडला असून, एक पर्यटक साधारण २०० फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा माहिती मिळताच साताऱ्यातील ‘शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स’ची टीम तातडीने घटनास्थळी रवाना झाली असून सध्या युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्ती किल्ल्याच्या कड्यावरून पाय घसरून थेट खोल दरीत कोसळली. या घटनेचा कॉल मिळताच ट्रेकर्सच्या टीमने आवश्यक साहित्यासह किल्ल्यावर धाव घेतली. दरीची खोली आणि ठिकाण अत्यंत दुर्गम असल्याने बचावकार्यात मोठे आव्हान उभे राहिले आहे, मात्र ट्रेकर्सचे पथक दोरखंडाच्या साहाय्याने खाली उतरून संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. बचाव पथक सुरक्षितरीत्या पर्यटकाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असून, पोलीस प्रशासनही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पर्यटकांनी गड-किल्ल्यांच्या कड्यावर उभे राहून सेल्फी काढताना किंवा फिरताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.

