रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा : निलेश मोरे.
सातारा : नुतन पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देताना संपर्कप्रमुख निलेश मोरे व इतर.

सध्या प्रत्येकाला कोणत्या तरी आजाराने ग्रासले आहे. वयोवृद्ध लोकांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे. शासनाच्या अनेक आरोग्यासाठी योजना असून त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहचला पाहिजे. त्यामुळे रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून काम करा अशा सूचना सातारा संपर्कप्रमुख निलेश मोरे यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने आरोग्यदूत मंगेश चिवटे,कार्याध्यक्ष रामहरी राऊत, राज्य कार्यकारिणी सदस्य जितेंद्र दगडू दादा सपकाळ शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख अनिल मोरे,सातारा जिल्हा संपर्क प्रमुख निलेश मोरे,सातारा जिल्हा प्रमुख दिपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनुसार शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सातारा जिल्हातील तालुकानिहाय नियुक्ती देण्यात आल्या
नियुक्ती खालील प्रमाणे
गणेश दशरथ कर्णे (खटाव तालुका प्रमुख), रुपाली सचिन जगताप (खटाव उपतालुका प्रमुख), राणी सुभाष लोंढे (कोरेगाव उपतालुका प्रमुख), वर्षा शंकर झंजूरने (कोरेगाव), दिपक तानाजी कदम (कोरेगाव उत्तर), नेहा किशोर शिंदे (कोरेगाव शहरप्रमुख),अक्षय विष्णू बामणे,(सातारा शहर समन्वयक),सोमनाथ भंडारे,(सातारा शहर समन्वयक),हिंदूराव माने (सातारा शहर समन्वयक),शिवराज विलासराव चव्हान (उपजिल्हा प्रमुख)
यावेळी निलेश मोरे व दिपक चव्हाण यांनी सातारा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हयात घ्ररातील व्यक्तींना शासनाच्या आरोग्य योजना समजल्या पाहिजेत व त्याचा लाभ कसा झाला पाहिजे असा सल्ला त्यांनी नवनियुक्त वैद्यकीय पदाधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी कोरेगाव पंचायतसमिती सदस्य सौ सुरेखा रमेश पाटिल,कोरेगाव तालुका संदिप फणसे, विद्या ताई बर्गे, प्रिया ताई झाणंजूरणे, मीनाक्षी मोरे,आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते…

