गुन्हेगारी

उंब्रज पोलिसांची दणदणीत कामगिरी….

दोष सिद्धीत जिल्ह्यात अव्वल; पोलीस अधीक्षकांकडून मानाचा सन्मान

उंब्रज/प्रतिनिधी राणी जाधव….
सातारा जिल्हा पोलीस दलात उंब्रज पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा आपली छाप निर्माण केली असून ऑक्टोबर २०२५ या महिन्यात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, कराड यांनी दिलेल्या निकालांमध्ये सर्वाधिक दोष सिद्धी मिळवत उंब्रज पोलीस ठाण्याने संपूर्ण जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरीचा मान पटकावला. गुन्हे उकलण्यात अचूक तपास, पुराव्यांचे काटेकोर संकलन आणि न्यायालयीन प्रक्रियेत दाखवलेली तत्परता या सर्वांचा परिणाम म्हणून उंब्रज पोलीसांना हा सन्मान पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते देण्यात आला.
अपराध्यांना शिक्षा होण्यासाठी तपास कसा असावा याचे उत्कृष्ट उदाहरण ठरलेली ही कामगिरी केवळ एका ठाण्याचा सन्मान नसून संपूर्ण सातारा पोलिस दलाच्या कार्यक्षमतेचे प्रतिबिंब आहे. प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने सातत्य, परिश्रम यांची उत्तम जोड देत गुन्हे सिद्ध करण्याची प्रक्रिया प्रभावीपणे पार पाडली.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी १८ नोव्हेंबर रोजी उंब्रज पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, विशेषत: सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे व अंमलदार यांना प्रमाणपत्र देऊन गौरव केला. त्यांच्या हातून मिळालेले सन्मानपत्र या पथकाच्या मेहनतीला योग्य अशी दाद ठरली.सन्मानपत्र देताना पोलीस अधीक्षकांनी भविष्यातही अशाच काटेकोर तपासयंत्रणेद्वारे गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्याची आणि समाजात शांतता-शिस्त प्रस्थापित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. उंब्रज पोलीस ठाण्याचा ही कामगिरी जिल्ह्यातील इतर ठाण्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button