महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलिसांची कारवाई.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलिसांची कारवाई ३ लाख ८९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सातारा तालुका पोलिसांनी प्रभावी कारवाई करत मोठ्या प्रमाणात अवैध दारू व वाहन असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दि. २९ जानेवारी २०२६ रोजी पोलीस निरीक्षक निलेश तांबे व गोपनीय अंमलदार पोहवा धनंजय कुंभार हे स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना मौजे दरेखुर्द हद्दीत महादरे रस्त्यालगत संशयास्पद अवस्थेत उभी असलेली मारुती स्विफ्ट कार (क्रमांक MH 14 GD 0165) आढळून आली. वाहनातील इसमांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने पंचासमक्ष तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान देशी व विदेशी दारूचे एकूण ९ बॉक्स (अंदाजे किंमत ₹३९,२००) तसेच अंदाजे ₹३,५०,००० किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ₹३,८९,२०० चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार मालोजी चव्हाण करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले व सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोहवा धनंजय कुंभार, पोहवा महेंद्र नारनवर, पोहवा मालोजी चव्हाण, पो.कॉ. सुनील भोसले व पो.कॉ. धिरज पारडे यांनी सहभाग घेतला.सदर कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button