मुंबई तर्फे आयोजित “आशा गौरव पुरस्कार 2026” सोहळा सातारा येथे उत्साहात संपन्न.
महिला दिनाच्या औचित्याने आशा फाऊंडेशन, नवी मुंबई तर्फे आयोजित “आशा गौरव पुरस्कार 2026” सोहळा सातारा येथे उत्साहात संपन्न झाला.

आज 08 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने आशा फाऊंडेशन, नवी मुंबई तर्फे आयोजित “आशा गौरव पुरस्कार 2026” सोहळा सातारा येथे उत्साहात संपन्न झाला.
सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकल पालक व अनाथ मुली तसेच संघर्षातून उभ्या राहिलेल्या प्रेरणादायी महिलांचा “आशा तेजस्विनी” व “आशा स्वयंसिद्धा” पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात सुप्रीम कोर्टाचे प्रसिद्ध वकील कायदेतज्ञ व लेखक मा. डॉ. अमर मुल्ला , जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा मा. श्री. तुषार दोशी (IPS), पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक मा. डॉ. अविनाश पोळ, संजीवन नॉलेज सिटी पन्हाळा संस्थापक व चेअरमन मा. श्री पी. आर. भोसले, WE चांगुलपणाच्या चळवळीचे संस्थापक मा. श्री. राज देशमुख, राज्य कर उपआयुक्त (GST) नवी मुंबई मा. स्वाती थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या कु. शिवानी बाळासो दडस यांना पहिलावहिला “आशा तेजस्विनी पुरस्कार २०२६” आणि कु. दिपाली शिवाजी घोलप यांना “आशा स्वयंसिद्धा पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला.
त्यांच्या जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वामुळे आज अनेकांसाठी नवी दिशा निर्माण झाली आहे. अशा फाउंडेशनचे संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक श्री दत्तात्रय जगताप संचालिका सौ रुपाली जगताप व संचालक अमोल भोसले यांनी संस्थेच्या कार्याची पुढील दिशाही उपस्थितांना सांगितली. यावेळी सातारा जिल्ह्यातील अनेक मान्यवर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते
आशा फाऊंडेशन, नवी मुंबई.




रा.शिवराई पो.बनशेद्रा ता.कन्नड जि.छत्रपती संभाजी नगर पिन कोड.431103