महाराष्ट्र
श्रीराम जानकी पुरस्कार चे मानकरी शशी जाधव, गुरुनाथ जाधव यांना जाहीर.
श्रीराम जानकी पुरस्कार चे मानकरी शशी जाधव, गुरुनाथ जाधव यांना जाहीर.

साताऱ्यातील ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांच्या वतीने देण्यात येणारा श्रीराम जानकी पुरस्कार पुढारीचे लोणंद प्रतिनिधी शशिकांत जाधव, गुरुनाथ जाधव यांना रविवार दि. 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पुढारी सातारा कार्यालयात प्रदान करण्यात येणार आहे.
सन्मानचिन्ह आणि 5 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी युवा महिला क्रिकेटपटू सानिका पाटील हिला सन्मानचिन्ह आणि 2500 रु. रोख देऊन गौरवण्यात येणार आहे. पुढारीचे ब्युरो मॅनेजर जीवनधर चव्हाण, निवासी संपादक हरीश पाटणे, शरद महाजनी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.



