महाराष्ट्र

सातारा नगरपालिकेतील सभापती निवडी बिनविरोध

सातारा नगरपालिकेतील शिक्षण व सांस्कृतिक सभापती – शंकर किर्दत यांची बिनविरोध निवड.

सातारा नगरपालिकेतील सभापती निवडी बिनविरोध
सातारा नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. या निवडी पिठासन अधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष दत्ता बनकर उपस्थित होते.
निवडीनुसार –
🔹 नियोजन सभापती – अशोक शेडगे
🔹 महिला व बालकल्याण सभापती – मोनिका घोरपडे
🔹 उपसभापती – सुजाता गिरीगोसावी
🔹 शिक्षण व सांस्कृतिक सभापती – शंकर किर्दत
🔹 बांधकाम सभापती – बाळासाहेब खंदारे
🔹 आरोग्य सभापती – धनंजय जांभळे
🔹 दुर्बल घटक सभापती – संकेत साठे
तसेच स्थायी समिती सदस्य म्हणून सुजाता राजेमहाडिक, जयवंत भोसले व राजू गोरे यांची नियुक्ती करण्यात आली.
निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या निवडी बिनविरोध झाल्याने नगरपालिकेतील सत्ताधारी गटात समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button