महाराष्ट्र

दरपत्रक वीज प्रश्नांवर निर्णय न झाल्याने प्रजासत्ताक दिनी रवी कांबळे यांचा वेश भूषा बदलून आत्मदहनाचा प्रयत्न

दरपत्रक वीज प्रश्नांवर निर्णय न झाल्याने प्रजासत्ताक दिनी रवी कांबळे यांचा वेश भूषा बदलून आत्मदहनाचा प्रयत्न

सर्व खाजगी दवाखाने व खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी स्पष्ट दरपत्रक लावणे बंधनकारक करावे, तसेच सातारा शहर व जिल्ह्यातील धोकादायक विद्युत वाहिन्या, जीर्ण विद्युत खांब आणि डीपी तात्काळ बदलाव्यात, या मागण्यांसंदर्भात यापूर्वी सादर करण्यात आलेल्या अर्जावर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.


या मागण्यांकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी वेष भूषा बदलत आत्मदहन करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केला. परंतू पोलिसांनी प्रसंगावधान राखत पोलिस व उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button