पाल यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज : सुरेश पाटील
पाल यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज : सुरेश पाटील

महाराष्ट्र’कर्नाटक व आंध्रप्रदेश या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धस्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाची यात्रा म्हणजेच खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा दि. ०२/०१/२०२६ रोजी संपन्न होत असून त्याकरिता प्रशासनाच्या सहकाऱ्यांनी पाल ग्रामपंचायत सज्ज झाली आहे असे मत जेष्ठ नेते व भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी पाल ग्रामपंचायतच्या आढावा बैठकीवेळी व्यक्त केले. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सुनीता घाडगे ह्या होत्या. यावेळी ग्रामपंचायत पाल तर्फे यात्रा कालावधीसाठी केलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. यात्रा भरविण्यात येणाऱ्या संपूर्ण वाळवंट परिसराची, मंदिर परिसराची व संपूर्ण गावातील स्वछता करण्यात आली असून संपूर्ण मिरवणूक केल्याचे उपसरपंच गणेश खंडाईत मार्गावरील रस्त्याचे नियोजन पूर्ण करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटी चेअरमन प्रशांत दळवी यांनी दिली.
‘यात्रेसाठी आलेल्या सर्व व्यापाऱ्यांना जागा वाटप पूर्ण झाले असून त्याठिकाणी असलेल्या व्यापाऱ्यांसाठी व भाविकांसाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचे तब्बल ५० नळाद्वारे नियोजन केले असून महिलांसाठी व पुरुषांसाठी व स्वतंत्र स्वच्छता गृहांचे देखील पुनरुज्जीवन केल्याचे उपसरपंच गणेश खंडाईत यांनी सांगितले.
यात्रा नियोजनासाठी ग्रामपंचायतीला मिळणारे अनुदान अल्प असून त्यात भरघोस वाढीची मागणी शासनाकडे करण्यात यावी अशी मागणी माजी उपसरपंच सुनील काळभोर यांनी केली. पाल गावामध्ये येणाऱ्या सर्व बाजूच्या रस्त्यांची डागडुजी बांधकाम विभागाच्या सहकार्याने करण्यात आली असून सर्व मार्गावरती विद्युत वितरण कंपनीच्या सहकार्याने प्रकाशव्यवस्था करण्यांत आल्याची माहिती सदस्य शिवराज पाटील यांनी दिली. संपूर्ण गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून मिरवणूक मार्गाची व यात्रा भरणाऱ्या ठिकाणाची पोलीस विभागाकडून पाहणी केली असून त्यांच्या मार्गदर्शखाली आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे सदस्य प्रकाश जगताप यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सांगितले.
तसेच नुकत्याच मा.प्रांताधिकारी, तहसीलदार, देवस्थान कमिटी व इतर सर्व विभागाचे अधिकारी यांच्या आढावा बैठकीमध्ये झालेल्या सर्व सूचनांचे पालन करून सर्वांच्या सहकार्याने भरणारी पाल यात्रा शांततेत पार पोडण्यासाठी ग्रामपंचायत पाल ने प्रशासनाच्या सहकायनि कंबर कसली आहे.
यावेळी भाजपचे पाल जिल्हा परिषद गटाचे नेते मदनभाऊ काळभोर, तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय गोरे, ग्रा. पं. सदस्या व माजी सरपंच सौ. जयश्री पाटील, सौ. कल्याणी इंजेकर, सौ. पवित्रा जगदाळे, ग्रामविस्तार अधिकारी सौ. सुचित्रा मस्के, तलाठी सौ. रोहिणी शिवपुजे यांसह विश्वासराव काळभोर, प्रशांत भोसले, हरीश पाटील, सतीश शिंदे, संतोष पाटील, गणेश इंजेकर, मोहन पाटील, मिलिंद पाटील, विजय दळवी, राजेंद्र मोहिते, पंडित इंजेकर, ओंकार पवार यासह ग्रामस्थ उपस्थित होते.



