Uncategorized
करंजे येथे उघड्या चेंबरवर तात्काळ लोखंडी जाळी; नगरसेवक रविराज किर्दत यांच्या तत्परतेमुळे नागरिकांना दिलासा

करंजे येथे उघड्या चेंबरवर तात्काळ लोखंडी जाळी; नगरसेवक रविराज किर्दत यांच्या तत्परतेमुळे नागरिकांना दिलासा
करंजे (प्रतिनिधी):
करंजे परिसरातील एका घरासमोरील गटारावरील धोकादायक आणि उघडे चेंबर गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करत होते. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ही गंभीर समस्या लक्षात येताच माननीय नगरसेवक रविराज किर्दत यांनी तात्काळ दखल घेत प्रशासकीय यंत्रणेमार्फत तिथे मजबूत लोखंडी जाळी बसवून घेतली.
नगरसेवक किर्दत यांनी केवळ सूचना न देता स्वतः या कामाचा पाठपुरावा केला आणि काम पूर्ण करून घेतले. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे संभाव्य अपघाताचा धोका टळला असून परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
”समस्या मांडल्याबरोबर तात्काळ मार्ग निघाला,” अशी भावना व्यक्त करत स्थानिक नागरिकांनी नगरसेवक रविराज किर्दत यांचे मनःपूर्वक जाहीर आभार मानले आहेत.



