Uncategorized

सातारा हिल रनर्स ग्रुपतर्फे स्वच्छता आणि ओपन जिमबाबत सातारा नगरपालिकेला निवेदन.

सातारा हिल रनर्स ग्रुपतर्फे स्वच्छता आणि ओपन जिमबाबत सातारा नगरपालिकेला निवेदन.

बॉम्बे रेस्टॉरंट ब्रिजखालील सातारा नगरपालिकेच्या विकसित जागेत रोज सकाळी स्वच्छता राखली जावी आणि तेथे ओपन जिम सुरू करण्यास परवानगी मिळावी, या मागणीसाठी ‘सातारा हिल रनर्स ग्रुप’च्या वतीने सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना निवेदन देण्यात आले.

या जागेत डॉ. सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सातारा हिल रनर्स ग्रुप’चे सदस्य दररोज सकाळी ६:०० ते ७:३० या वेळेत वर्कआउट, व्यायामासाठी सातारा शहर उपनगरातील साधारण १५० ते २०० पुरुष आणि १०० ते १२५ महिला नियमितपणे सहभागी होतात. या ठिकाणी नागरिकांची संख्या मोठी असल्याने तेथे नियमित स्वच्छता असणे आवश्यक आहे. तसेच, ‘सातारा हिल रनर्स फाउंडेशन’मार्फत येथे नागरिकांसाठी ओपन जिम उभारण्यात येणार असून, त्यासाठी पालिकेने रीतसर परवानगी द्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी या निवेदनाची तातडीने दखल घेतली. त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यालयात बोलावून, सदर जागेची नियमित स्वच्छता करणे आणि जिमच्या परवानगीबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या.

हे निवेदन देतेवेळी सातारा हिल रनर्स ग्रुपचे सदस्य विष्णू शिंदे, शैलेश शिंदे, अशोक भोसले, संदीप जाधव, दत्ता बोडके,श्रीकांता गायकवाड आणि ज्योती गोरे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button