महाराष्ट्र

मातोश्री वृद्धाश्रम महागाव येथे पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना मार्फत मानव सेवा

मातोश्री वृद्धाश्रम महागाव येथे पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना मार्फत मानव सेवा कार्यक्रम संपन्न

मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. याचा प्रत्यय घडून देणारी कामगिरी जवाहर नवोदय विद्यालय सातारा येथील राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र सैनिकांनी अर्थात एनसीसीच्या कॅडेटने मातोश्री वृद्धाश्रम महागाव येथे जाऊन तेथील वृद्धांच्या सोबत हितगुज केले तसेच त्यांची विचारपूस करून त्यांना भावनिक आधार व आपलेपणा वाटावा याकरिता मुलांनी आणि मुलींनी मोलाचे आत्मबल निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या समवेत काही काळ मुला मुलींनी घालविला. तेथील वृद्धांना आपल्या खाऊतला वाटा त्यांना भरवण्यात आनंद वाटला. हा आनंद एनसीसी चे प्रभारी मोहन बगले यांच्यामुळे द्विगुणित झाला. मुला मुलींना मोहन बगले सरांनी मार्गदर्शन करीत योग्यरीत्या तेथे जाऊन त्या परिसराची पाहणी करून आवश्यक तेवढा जास्तीत जास्त परिसर स्वच्छ करण्याकरीता मुलांना तयार करून तो परिसर स्वच्छ करून घेतला अर्थात तेथे श्रमदानाचे काम व सफाई अभियानाचे कार्य मुलांनी समूहाने केले तसेच तेथील वृद्धांना त्यांना आवश्यक असेल ती सेवा देण्याचा प्रयत्न केला. याकरीता विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती अँसी ए जे यांनी मुला मुलींना या कामी प्रोत्साहित करून सेवाभावाचे काम करून आपण एक आदर्श स्थापित केला. त्याचबरोबर विद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंदाने सहकार्य केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button