दहिवडी-सातारा-दहिवडी ‘विना वाहक विना थांबा’ बस सेवेचा शुभारंभ; प्रवाशांचा उदंड प्रतिसाद!

दहिवडी / सातारा: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील मा. विभाग नियंत्रक श्रीमती ज्योती गायकवाड मॅडम व विभागीय वाहतूक अधिकारी श्री. सचिन शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये, दहिवडी आगाराची ‘विना वाहक विना थांबा’ (Non-Stop) दहिवडी-सातारा-दहिवडी बस सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी लोकार्पण करण्यात आली आहे.
दहिवडी आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. अजित गोसारडे यांच्या सूचनेनुसार, पहिली बस सकाळी ६:३० वाजता दहिवडी आगारातून उत्साहात मार्गस्थ झाली.
त्यानंतर सातारा येथून दहिवडीकडे जाणाऱ्या फेरीचा शुभारंभ सातारा एसटी स्थानकात दहिवडी आगाराचे चालक श्री. संतोष मोरे (बॅच नं. ४८८३) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
या प्रसंगी सातारा आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. युवराज कदम साहेब, दहिवडी आगाराचे लेखाकार श्री. धनाजी जाधव, विभागीय कार्यालयातील वाहतूक शाखेचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक अशोक जाधव, विशाल गाडे साहेब, वाहतूक नियंत्रक बिनी मुल्ला, वाहक श्री. राजेंद्र पवार यांच्यासह रा. प. कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वेगवान आणि विनासायास प्रवासाची सोय उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांमध्ये अत्यंत समाधानाचे वातावरण पाहावयास मिळाले. उद्घाटनाची पहिलीच बस प्रवाशांनी पूर्ण भरून (हाऊसफुल्ल) मार्गस्थ झाली, ज्यामुळे या नव्या सेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.



