Uncategorized

कुडाळात तलवार बाळगणाऱ्यावर कारवाई; राधेश्याम मोरया याच्या विनापरवाना भंगार गोदामातून शस्त्र जप्त

कुडाळ प्रतिनिधी प्रसन्न पवार

कुडाळ-हुमगाव रस्त्यालगत असलेल्या विनापरवाना सुरू असणाऱ्या भंगार गोदामात तलवार बाळगून ती कागदी पुठ्ठ्यांच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मेढा पोलिसांनी तातडीने कारवाई करत शिवकुमार संतराम शर्मा (वय ३६,सध्या रा. कुडाळ,ता.जावळी,मूळ रा.उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता कुडाळ-हुमगाव मार्गालगत राधेश्याम रामकृपाल मौर्या यांच्या भंगार गोदामात ही कारवाई करण्यात आली. संशयिताने जिल्हादंडाधिकारी, सातारा यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना तलवार स्वतःच्या ताब्यात ठेवली होती.ही तलवार गोदामातील कागदी पुठ्ठ्यांच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ओंकार उत्तम दीक्षित (बक्कल क्र. १६०२) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार श्रीमंत यादव करीत आहेत.
दरम्यान, कुडाळ परिसरातील विनापरवाना भंगार व्यवसाय आणि त्यासंदर्भातील विविध तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या तातडीच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.बेकायदेशीर शस्त्रे,संशयास्पद हालचाली किंवा कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या प्रकारांवर पोलिसांनी कठोर नजर ठेवावी,अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.तपासात पोलीस हवालदार प्रमोद निकम यांनी मोलाचे सहकार्य केले.

तसेच कुडाळसह जावळी तालुक्यातील भंगार व्यवसायांच्या ठिकाणी परवाने,कागदपत्रे,सुरक्षा व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची तपासणी करण्यात यावी,अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

 

पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक

परप्रांतीय व्यक्तींकडून विनापरवाना भंगार व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारींवरून विविध शासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू असतानाच,भंगार गोदामातून तलवार जप्त करून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याने मेढा पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.विशेषतः शस्त्रबंदी आदेशाची अंमलबजावणी करताना पोलिसांनी दाखविलेली दक्षता महत्त्वाची मानली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button