मुंबई उपवर्गीकरण महामोर्चासाठी सातारा जिल्ह्यातील मातंग समाजाने बहुसंख्येने उपस्थित राहावे….जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव

सातारा, प्रतिनिधी श्रीकांत गोळे
अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी घेऊन दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर ‘उपवर्गीकरण निर्धार महामोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. या महामोर्चामध्ये सातारा जिल्ह्यातील मातंग समाजाने व अनुसूचित जाती मधील इतर 59 जात समाज बांधवानी बहुसंख्येने सहभागी होऊन आपली एकजूट दाखवावी, असे आवाहन लहुजी शक्ती सेना सातारा जिल्हाध्यक्ष श्री. बाळासाहेब जाधव यांनी केले आहे.
आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने व मोर्चे आयोजित करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई येथे होणाऱ्या महामोर्चाला महाराष्ट्रातील मातंग समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे.
लहुजी शक्ती सेना संस्थापक मा. विष्णुभाऊ कसबे, आमदार अमित गोरखे, आमदार सुनिल कांबळे,साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे, लहुजी शक्ती सेना प्रदेशाध्यक्ष मा. कैलासदादा खंदारे,यांच्यासह समाजातील इतर नेते यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली समाजाच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्यात सातारा जिल्ह्याचीही भक्कम उपस्थिती असणे आवश्यक आहे, असे बाळासाहेब जाधव यांनी सांगितले.
“सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मातंग समाज बांधव, व इतर समाजातील महिला, युवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मुंबईकडे कूच करावे. आपल्या हक्काच्या मागणीसाठी एकजुटीने आणि शांततेच्या मार्गाने या महामोर्चात सहभागी व्हावे,” असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी केले.
मुंबईतील हा महामोर्चा २९ सप्टेंबर रोजी होणार असून उपवर्गीकरणाची मागणी शासनापर्यंत ठामपणे पोहोचविण्यासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी खेड ग्रामपंचायत उपसरपंच कांतीलाल कांबळे,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन कांबळे,शहरप्रमुख श्रीकांत कांबळे,सागर शिंदे युवक जिल्हाध्यक्ष,सौ मधुताई कांबळे मा.सदस्या,जि. प. सातारा सौ. शोभाताई जाधव मा.सदस्या पं.स.खंडाळा सौ अर्चना कांबळे नगरसेविका सातारा, राजेंद्र सकटे उपसरपंच शहापूर तालूका अध्यक्ष सातारा, कैलास भिसे उपसरपंच अंदोरी तालूका प्रमुख खंडाळा, रामभाऊ पाटोळे संपर्कप्रमुख , ऍड साठे, आनंद भिसे तालूका अध्यक्ष फलटण दादा गायकवाड,मोहन खुडे तालूका अध्यक्ष जावली, सुनिल भिसे,दिपक खवळे माण तालूका, सविता भिसे अध्यक्ष महिला आघाडी माण हे उपस्थित होते.



