सातारा तालुका पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २७ गुंडांवर हद्दपारीची कारवाई.

सातारा: आगामी गणेशोत्सव आणि सण-उत्सवांच्या काळात शहरासह तालुका परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सातारा तालुका पोलिसांनी गुन्हेगारांवर जोरदार ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तब्बल २७ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून, १६०० हून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार (दि. २२ सप्टेंबर २०२६), सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारामारी, खंडणी, चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या २७ इसमांवर ही धडक कारवाई करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना व प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गणेशोत्सवाचे शेवटचे २ दिवस या २७ जणांना सातारा तालुका हद्दीतून हद्दपार (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ नुसार) करण्यात आले आहे.
याशिवाय, सण-उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ अन्वये तब्बल १,६८५ संशयित व उपद्रवी इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
विविध गावांतील २७ इसमांवर कारवाई
या कारवाईत लिंब, डबेवादी, शेंद्रे, वर्हे, आंगापूर, नागेवाडी, मालगाव, परळी, मौजे हमदाबाज, कण्हेर, तासगाव, माळ्याचीवाडी आदी भागांतील इसमांचा समावेश आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या यादीत सुनीता गोपिचंद माने, रुपेश दगडू माने, दर्शन दयानंद माने, प्रतीक सुनील माने, अनिकेत संजय माने, कुलदीप धर्मेंद्र माने, मयुरेश मंगेश चोरे, शशिकांत हणमंत चाकरे, शुभम उद्धव इंदलकर, प्रितम संजय जाधव, शरद आनंदा जगदाळे, जयदिप पोपट यादव, नदीम नासीर सय्यद, संतोष कृष्णा जाधव, शापीर महंमद मुल्ला, निळकंठ शिवाजी सावंत, महादेव मंडीवळ नाटेकर, समीर आघानाज पटेल, सुजाता राहुल गंगापणे, महिताब जब्बार शेख, सतीश बजरंग वाघमळे, उमेश सदाशिव यादव, उमेश दिनकर दुदुरकर, गणेश बबन कोरडे, रतन रामचंद्र जाधव, सुनीता गोपिचंद माने आणि संजय बबन जामदार यांचा समावेश आहे.
पोलीस प्रशासनाचे कडक इशारे व आवाहन:
- कायदेशीर कारवाई: हद्दपार केलेल्या २७ गुन्हेगारांनी या काळात तालुका हद्दीत प्रवेश केल्यास त्यांच्यावर थेट कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- नागरिकांना आवाहन: सर्व नागरिकांनी गणेशोत्सव व सण-उत्सव अत्यंत शांततेत व उत्साहात साजरे करावेत. हद्दीत कुठेही अनुचित प्रकार किंवा संशयित हालचाली आढळून आल्यास तात्काळ सातारा तालुका पोलिसांशी संपर्क साधावा.
तालुका पोलिसांच्या या धडक आणि आक्रमक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.



