जावलीत छत्रपती संघटनेकडून कृषी विभागाचा नागरी सत्कार; राठोड साहेबांसह कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता.

जावली (प्रतिनिधी श्रीकांत गोळे):
जावली तालुक्यातील कृषी विभागाचे विभागीय अधिकारी मा. श्री. राठोड साहेब यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक, जनहित आणि विकासाभिमुख उपक्रमांना दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल ‘छत्रपती संघटना, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
शासकीय कर्तव्ये पार पाडताना नागरिकांच्या हिताला प्राधान्य देऊन विविध सामाजिक उपक्रमांमध्ये कृषी विभागाने सातत्याने सकारात्मक सहभाग नोंदवला आहे. प्रशासन आणि सामाजिक संघटनांमधील या समन्वयामुळे अनेक जनहिताची कामे अधिक प्रभावीपणे राबवता येतात, असा विश्वास यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य संघटना प्रमुख श्री. तृशांत भाई शेलार, उपसंघटना प्रमुख श्री. तानाजी भाऊ किर्दत, महिला प्रदेश अध्यक्ष श्रीमती मुक्ताताई लोहार, राज्य पत्रकार श्री. शेखर भाऊ जाधव, पत्रकार श्री. मोहन खुडे, श्री. श्रीकांत गोळे, श्री. सुनिल धनावडे, श्री. बजरंग चौधरी, श्री. प्रथमेश भोकरे, श्री. संदीप भोसले तसेच जावली तालुका उपाध्यक्ष श्री. अनिल केसकर यांनी कृषी विभागाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



