राजा शिवछत्रपती सांस्कृतिक मंडळ, हायवे पार, करंजे येथे गौरी-गणपती सणानिमित्त ‘मंगळागौर’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

करंजे: येथील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक मंडळ (हायवे पार) च्या सर्व महिला सदस्यांच्या वतीने गौरी-गणपतीच्या सणाचे औचित्य साधून पारंपारिक ‘मंगळागौर’ कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.
गौरी-गणपतीच्या आगमनामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असताना, मंडळाच्या महिला सदस्यांनी एकत्र येत या पारंपारिक खेळांचे आयोजन केले. कार्यक्रमाची सुरुवात मंगळागौरीच्या आणि श्री गणेशाच्या पूजनाने झाली. यावेळी महिला सदस्यांनी पारंपरिक साडी व अलंकार परिधान करून पूजेचा विधी श्रद्धेने पार पाडला.
पूजेनंतर महिलांसाठी विविध पारंपरिक खेळांची जुगलबंदी पाहायला मिळाली. यामध्ये फुगडी, झिम्मा, ‘पिंगा’, ‘कीक मार कीक’, ‘गात-गात किसबाई’, ‘नाच गं घुमा’ आणि ‘घागर घुमवणे’ यांसारखे खेळ महिलांनी अत्यंत हिरिरीने व आनंदाने खेळले. जुन्या लोकसंस्कृतीचा वारसा जपत सादर केलेल्या या खेळांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
गौरी-गणपतीच्या या पावन पर्वात आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील महिलांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व महिला सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी महाआरती करून सर्व उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.



