छत्रपती प्रतापसिंह महाराज नगर वाचनालयातर्फे शालेय स्पर्धांचे आयोजन.
बालवाडी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; विविध कलागुणांना मिळणार वाव.

सातारा (विशेष प्रतिनिधी): येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बालवाडी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय स्पर्धा २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे आणि वाचन संस्कृती वाढवणे या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती वाचनालयाच्या सौ. वैदेही कुलकर्णी यांनी दिली आहे.या स्पर्धा बालवाडी (मोठा गट) ते चौथी आणि पाचवी ते दहावी अशा विविध गटांमध्ये घेतल्या जाणार आहेत.
असे असेल स्पर्धेचे स्वरूप व वेळापत्रक:
- बालवाडी (मोठा गट): बडबडगीत स्पर्धा – २ ऑक्टोबर २०२६ (वेळ: २ मिनिटे)
- इयत्ता १ ली व २ री: साभिनय गीत स्पर्धा – ३ ऑक्टोबर २०२६ (वेळ: २ मिनिटे)
- इयत्ता ३ री व ४ थी: कथाकथन (गमतीच्या गोष्टी) – ४ ऑक्टोबर २०२६ (वेळ: ३ मिनिटे) (टीप: बालवाडी ते चौथीपर्यंतच्या सर्व स्पर्धा कन्याशाळा येथे दुपारी ४:०० वाजता होतील. नाव नोंदणीची अंतिम तारीख २६ सप्टेंबर २०२६ आहे.)
- इयत्ता ५ वी व ६ वी: वक्तृत्व स्पर्धा (विषय: पाणी हेच जीवन, सण-उत्सव माझ्या कल्पनेतील, अशी झाली फजिती) – १० ऑक्टोबर २०२६ (वेळ: ३ ते ५ मिनिटे)
- इयत्ता ७ वी व ८ वी: सामान्यज्ञान लेखी प्रश्नमंजुषा (५० गुण) – १० ऑक्टोबर २०२६ (वेळ: ३० मिनिटे)
- इयत्ता ९ वी व १० वी: समूह कविता अभिवाचन (कुसुमाग्रज, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, ग.दि. माडगुळकर यांच्या कविता) – १० ऑक्टोबर २०२६ (वेळ: ८ ते १० मिनिटे) (टीप: पाचवी ते दहावीच्या स्पर्धा नगर वाचनालय येथे दुपारी ४:०० वाजता होतील. नाव नोंदणीची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर २०२६ आहे.)
स्पर्धेचे नियम व प्रवेश:
सर्व स्पर्धा मराठी माध्यमातून होतील (इंग्रजी माध्यमातील विद्यार्थीही सहभागी होऊ शकतात). स्पर्धेसाठी प्रत्येकी ₹ १०/- प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. सर्व स्पर्धा दुपारी ठीक ४:०० वाजता सुरू होतील, त्यामुळे स्पर्धकांनी वेळेपूर्वी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. आयत्या वेळी किंवा फोनवर नावे स्वीकारली जाणार नाहीत.
सातारा व परिसरातील सर्व शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांची नावे वेळेत नोंदवून या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



