Uncategorized

महाबळेश्वर आगारातील मोफत डोळे तपासणी व आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; एस.टी. कर्मचारी, अधिकारी व नागरिकांनी घेतला लाभ.

छत्रपती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सर्वटे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर तसेच डॉ. अग्रवाल डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजित मोफत डोळे तपासणी व आरोग्य शिबिर

महाबळेश्वर आगारातील मोफत डोळे तपासणी व आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; एस.टी. कर्मचारी, अधिकारी व नागरिकांनी घेतला ला

महाबळेश्वर (प्रतिनिधी)श्रीकांत गोळे.

छत्रपती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सर्वटे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर तसेच डॉ. अग्रवाल डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मोफत डोळे तपासणी व आरोग्य शिबिरास महाबळेश्वर आगार येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एस.टी. महामंडळातील चालक, वाहक, कर्मचारी, अधिकारी तसेच प्रवासी व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला.

चालक व वाहक बांधवांची दृष्टी उत्तम राहणे हे प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन छत्रपती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ९ सप्टेंबर रोजी मेढा आगार, १० सप्टेंबर रोजी सातारा आगार आणि ११ सप्टेंबर रोजी महाबळेश्वर आगार येथे मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे अनेक कर्मचारी व नागरिकांची डोळ्यांची तपासणी झाली असून, आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन मिळाले.

महाबळेश्वर आगारातील शिबिरास आगार व्यवस्थापक श्री. महेश श्रीराम जाधव, स्थानक प्रमुख श्रीमती प्राजक्ता सूर्यकांत मोहिते, आगार लेखाकार श्री. महेश अशोक शिंदे, यातायात एसआयएस निरीक्षक श्री. अमर यज्ञवंत शिंदे, यातायात वाहतूक निरीक्षक श्री. किरण बालासाहेब धूमल, सहा. वरिष्ठ लिपिक श्री. विकास कांबळे व श्री. अजीत अण्णा जमदाडे यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिबिराचे नियोजन व आयोजन उत्कृष्टरीत्या पार पडले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी छत्रपती संघटना, महाराष्ट्र राज्यचे संघटना प्रमुख श्री. तृशांत भाई शेलार व उपसंघटना प्रमुख श्री. तानाजी भाऊ किर्दत यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच संघटनेचे पदाधिकारी श्री. बी. भोसले, श्री. जी. परशुराम वाघमारे, श्री. शेखर जाधव, श्री. अभिषेक शेलार, श्री. श्रीकांत गोळे, श्री. सचिन गाडे, श्री. प्रकाश जाधव, श्री. अनिल केसकर, श्री. विठ्ठल कदम, श्रीमती मुक्ताताई लोहार, श्री. मोहन खुडे आणि श्री. प्रथमेश भोकरे यांनी शिबिराच्या यशासाठी मोलाचे योगदान दिले.

एस.टी. कर्मचारी, अधिकारी तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. “समाजहित आणि जनसेवा हेच आमचे ध्येय” या उद्देशाने छत्रपती संघटना, महाराष्ट्र राज्य यापुढेही आरोग्य जनजागृती, कर्मचारी कल्याण आणि समाजहितासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

मोफत डोळे तपासणी शिबिराच्या माध्यमातून एस.टी. कर्मचारी, अधिकारी व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button