Uncategorized

जावलीत उद्या रंगणार शिक्षक आणि गुणवंतांचा सन्मान सोहळा!

ना.श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली भव्य पुरस्कार वितरण सोहळा.

कुडाळ प्रतिनिधी:- प्रसन्न पवार

शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती जावलीच्या वतीने आयोजित ‘आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण’ तसेच ‘गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक गुणगौरव सोहळा’ उद्या,शनिवार दि.१२ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता मेढा येथील कलश मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले (महाराजसाहेब) उपस्थित राहणार आहेत.तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा तसेच विविध परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या वेळी विशेष गौरव करण्यात येणार आहे.

या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन,जि.प.अध्यक्षा डॉ.प्रिया शिंदे,उपाध्यक्ष राजू (भैय्या) भोसले,जावली पंचायत समितीचे सभापती सौरभ (बाबा) शिंदे आणि जि.प.शिक्षण सभापती तेजस्विनी कदम उपस्थित राहणार आहेत.
तसेच जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे,कविता ओंबळे,जयश्री गिरी,जावली पंचायत समिती उपसभापती गोरख महाडीक,सदस्य चारुशिला पवार,शिल्पा शिंदे,सुनिता दुंदळे,आतिश कदम,मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रूपाली वारागडे व उपनगराध्यक्ष विकास देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

प्रशासकीय पातळीवरून प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील आणि गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्यासह शिक्षक बँकेचे चेअरमन विशाल कणसे, संचालक विजय शिर्के,शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिर्के व शिक्षक संघाचे अध्यक्ष तानाजी आगुंडे उपस्थित राहतील.

या सोहळ्यास तालुक्यातील सर्व विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जावली पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button