Uncategorized
वीर जवान रोहित पवार यांना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण; उद्या चिंचणी येथे अंत्यसंस्कार.

वीर जवान रोहित पवार यांना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण; उद्या चिंचणी येथे अंत्यसंस्कार
चिंचणी: ११४ आर्मर्ड इंजिनियर रेजमेंटमध्ये देशसेवेत कार्यरत असलेले कॅप्टन/नाईक रोहित रामचंद्र पवार (वय ३६) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. देशसेवेत बजावत असलेल्या कर्तव्यादरम्यानच त्यांना हा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
नाईक रोहित पवार हे अत्यंत कर्तव्यदक्ष आणि निष्ठावान सैनिक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण चिंचणी गावावर व परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.
रोहित पवार यांचे पार्थिव गावी आणण्यात येणार असून, उद्या चिंचणी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर पूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.



