छत्रपती संघटना, महाराष्ट्र राज्य याचा ‘दृष्टी’ जपणारा सामाजिक पुढाकार: मेढा एसटी आगारात मोफत नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१२० ते १३० एसटी कर्मचारी, अधिकारी व नागरिकांनी घेतला लाभ; छत्रपती संघटनेचा उपक्रम.

मेढा / प्रतिनिधी श्रीकांत गोळे.
सामाजिक बांधिलकी जपत छत्रपती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मेढा एसटी आगार येथे मोफत डोळे तपासणी व आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सर्वटे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर तसेच डॉ. अग्रवाल डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात एसटी महामंडळातील चालक, वाहक, कर्मचारी, अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
१२० ते १३० जणांची नेत्रतपासणी
या शिबिरात सुमारे १२० ते १३० जणांनी आपल्या डोळ्यांची मोफत तपासणी करून घेतली. अनुभवी नेत्रतज्ज्ञांनी सहभागींची सखोल तपासणी करून दृष्टीदोष, चष्म्याचा नंबर आणि डोळ्यांशी संबंधित विविध आजारांवर आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन केले.
सुरक्षित प्रवासासाठी चालक-वाहकांच्या आरोग्यावर भर वाहतूक क्षेत्रात कार्यरत असलेल्या चालक व वाहकांचे डोळ्यांचे आरोग्य उत्तम असणे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन छत्रपती संघटनेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. या शिबिरामुळे अनेक कर्मचाऱ्यांना प्रथमच सखोल नेत्रतपासणी करून घेण्याची संधी मिळाली.
एसटी प्रशासनाचे मोलाचे सहकार्य
शिबिराच्या आयोजनात कामगार अधिकारी श्रीमती धुमाळ मॅडम, आगार व्यवस्थापक श्री. सागर पांढरपट्टे, कार्यशाळा प्रमुख श्री. जगदीश लोंढे, स्थानक प्रमुख श्री. अजित मुगडे, लेखाकार सौ. योजना कदम, वरिष्ठ लिपिक श्री. शरद शेरकर, वाहतूक नियंत्रक श्री. मनिष बेंद्रे, श्री. अंकुश पवार यांच्यासह सर्व कर्मचारीवृंदाचे विशेष सहकार्य लाभले.
मान्यवरांची उपस्थिती अन् कौतुक

मेढा एपीआय श्री. सुधीर पाटील आणि पीडब्ल्यूडी अधिकारी श्री. महेश कोणाळकर यांनी शिबिराला भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले. नागरिकांच्या आरोग्यासाठी राबविण्यात येणारे असे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
संघटना पदाधिकाऱ्यांचे विशेष योगदान
छत्रपती संघटना, महाराष्ट्र राज्यचे संघटना प्रमुख श्री. तृशांतभाई शेलार व उपसंघटना प्रमुख श्री. तानाजी भाऊ किर्दत यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाची व्यवस्था, नोंदणी व शिबिराचे नियोजन करण्यात आले.
तसेच संघटनेचे पदाधिकारी बी. संदीप भोसले, जी. परशुराम वाघमारे, श्री. शेखर जाधव, श्री. अभिषेक शेलार, श्री. श्रीकांत गोळे, श्री. सचिन गाडे, श्री. प्रकाश जाधव, श्री. अनिल केसकर, श्री. विठ्ठल कदम, श्रीमती मुक्ताताई लोहार (महिला प्रदेश अध्यक्ष), श्री. मोहन खुडे, श्री. प्रथमेश भोकरे आणि सुहास जाधव यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन
तपासणीदरम्यान ज्या कर्मचाऱ्यांना व नागरिकांना पुढील उपचारांची गरज भासली, त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून पुढील वैद्यकीय उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. छत्रपती संघटना भविष्यातही आरोग्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात असे उपक्रम सातत्याने राबवणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.



