Uncategorized

वाढदिवसाला पुस्तक भेटीचा संस्कार! चिंचणी गावातील अभ्यासिकेच्या उपक्रमाचे सावित्रीबाई फुले महाविद्यालयाकडून कौतुक.

चिंचणी अभ्यासिकेस सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाकडून पुस्तकांची भेट; डॉ. शेख सरांकडून १,००० पुस्तके देण्याचे जाहीर.

रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महाविद्यालयाकडून चिंचणी अभ्यासिकेस पुस्तके भेट; डॉ. शेक सरांकडून १,००० पुस्तके देण्याची घोषणा!

चिंचणी (प्रतिनिधी) श्रीकांत गोळे.

रयत शिक्षण संस्था संचलित, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील अभ्यासिका, चिंचणी येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि विविध विषयांवरील अत्यंत महत्त्वाची पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली.

कर्मवीर आण्णांनी दिलेला “शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही” हा मंत्र शिरसावंद्य मानून २०२१-२२ मध्ये चिंचणी गावात ही अभ्यासिका सुरू करण्यात आली होती. आज या अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आपल्या उज्ज्वल भविष्याची घडण करत आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने अभ्यासिकेला पुस्तक भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम चिंचणी ग्रामस्थांकडून राबवला जातो.

कार्यक्रमादरम्यान गावातील शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची आवड पाहून राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. इन्नुस शेख यांनी अभ्यासिकेला आगामी काळात १,००० पुस्तके भेट देणार असल्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.

कार्यक्रमाचे स्वागत सरपंच जितेंद्र सावंत यांनी केले, तर आभार अभ्यासिकेतील विद्यार्थी कु. प्रज्वल सावंत याने मानले. या मौल्यवान सहकार्याबद्दल महिला कॉलेजचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव मा. श्री. शिवलिंग मेनकुदळे तसेच महाविद्यालयाचे चिंचणी ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर सरपंच जितेंद्र सावंत, ग्रामसेवक वर्षा दळवी, ग्रामपंचायत सदस्य बबनराव खुरासणे, तलाठी कु. जयेश गोळे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. इन्नुस शेख, प्रा. ऐश्वर्या क्षीरसागर, प्रा. ऋतुजा पवार, प्रा. ज्योती कदम आणि पूनम डिगे यांच्यासह महिला कॉलेजच्या विद्यार्थिनी व अभ्यासिकेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button