Uncategorized

वस्तुनिष्ठ बातमीतून समाजहितासाठी पत्रकारितेचा उपयोग होतो…राज्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर.

मेढा/ सातारा
प्रतिनिधी:-श्रीकांत गोळे.
राज्यातील तरुण पत्रकारांनी घाई गडबडीने बातमी बनवून प्रसिद्ध करू नये तर त्या बातमीची शहानिशा करून बातमी मागची वस्तुस्थिती पाहून ती प्रसिद्धी करून त्यामागची कारणे व मीमांसा तपासून योग्य बातमी झाली तर समाजहितासाठी आपली पत्रकारितेचा आधार व न्याय समाजाला मिळत असून समाज हितासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याची भूमिका असावी असे उद्गार अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी नवोदितांच्या स्नेह भेटीत केले.

जावली तालुका मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारांशी हॉटेल रिटको लॅण्ड वरील शुभेच्छा भेटीत वार्तालाप करताना रायगड सागरचे संपादक व कोकण विभागीय पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार मनोज खांबे यांनी मार्गदर्शन करतांना म्हंटले की पत्रकार हा जनतेच्या मनातील हुंकार असून त्याच्या लेखणीतून सुटलेल्या बाणाने समाजातील पीडितांना व शोषितांच्या न्याय हक्काची जाणीव करून देणे व त्या बरोबरचआपण समाजाचे प्रश्ण संघटनात्मक मांडल्यास त्या बातमीतील समाजाचे प्रश्न निश्चितपणे सुटतात.

प्रारंभी जेष्ठ पत्रकार व सुप्रसिद्ध चित्रकार मोहन जगताप यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत गोपाळे,व कोकण विभागीय अध्यक्ष मनोज खांबे यांचा परिचय व स्वागत केले..
प्रारंभी नवोदित पत्रकारांशी मनमोकळेपणाने जेष्ठ पत्रकारां सोबत विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी जेष्ठ नागरिक व प्रियदर्शनी माथाडी पतसंस्थेचे अध्यक्ष अनंत जाधव, दिलीप जाधव (सेवानिवृत्त मुंबई पोलीस).पत्रकार सुनिल धनावडे ,मोहन खुडे, श्रीकांत गोळे व मान्यवर पत्रकारांनी येणार्‍या सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयावर चर्चा केली. जितिन वेनदे यांनी सूत्रसंचालन केले. मोहन जगताप यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button