वाय सी कॉलेज परिसरात खळबळ: वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या

वाय सी कॉलेज परिसरात खळबळ: वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या
सातारा: येथील यशवंतराव चव्हाण (वाय सी) सायन्स कॉलेजच्या वसतिगृहात आज एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. तिसऱ्या मजल्यावरून अचानक खाली उडी मारून १९ वर्षीय तरुणीने आपले जीवन संपवले. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्याने तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला.
घटनास्थळी पोलिसांची धाव, तपासाचे चक्र वेगाने घटनेची माहिती मिळताच पोलीस दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसराची नाकेबंदी केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुणी ही जावली तालुक्यातील रहिवासी होती. मात्र, तिने हे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस वसतिगृहातील इतर मुली आणि कॉलेज प्रशासनाकडून माहिती घेत आहेत.
जिल्हा रुग्णालयात तणाव आणि गोंधळ घटनेनंतर तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे. घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच रुग्णालयाबाहेर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली असून तेथे प्रचंड गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.



