Uncategorized

गांजा विक्री करणाऱ्या इसमास भुईंज पोलिसांनी केली अटक , 37,800/- रुपये किमतीचा 1 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त.

गांजा विक्री करणाऱ्या इसमास भुईंज पोलिसांनी केली अटक , 37,800/- रुपये किमतीचा 1 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त.दिनांक 22/8/2026 रोजी सपोनि पृथ्वीराज ताटे यांना माहिती मिळाली इसम नामे हनमंत किसन कणसे रा.आसले,तालुका – वाई,जिल्हा – सातारा हा त्याचे राहते घराच्या पाठीमागून चोरून गांजा विक्री करीत आहे अशी माहिती मिळाल्याने पुनम झगडे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि पृथ्वीराज ताटे व त्यांच्या पथकाने अचानक हनमंत किसन कणसे यांच्या घरावर छापा टाकून त्याच्याकडून 37,800/- रुपये किंमतीचा 1 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. सदरची कारवाई पुनम झगडे,परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भुईंज पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे.

सदर कारवाईबाबत मा.निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा, मा.वैशाली कडुकर,अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, मा.सुनील साळुंखे उपविभागीय पोलिस अधिकारी वाई विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पुनम झगडे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक, पृथ्वीराज ताटे सपोनी, सुरज शिंदे, अजित मोरे, पोलीस उपनिरीक्षक , शिवाजी तोडरमल, वैभव टकले सपोफौ, नितीन जाधव, गणेश घोटकर पोलीस हवालदार, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, आकाश कुंभार यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असून कारवाई मध्ये सहभागी अधिकारी अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक सातारा,मा.अपर पोलीस अधीक्षक सातारा व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वाई यांनी अभिनंदन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button