Uncategorized

अखिल भारतीय मराठा महासंघाची रिटकवली येथे सभा उत्साहात संपन्न.

मेढा :- रिटकवली तालका जावळी येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने  मराठा समाजाची महत्त्वपूर्ण सभा संपन्न झाली. 

जावळी प्रतिनिधी/ श्रीकांत गोळे 

मराठा समाजाच्या न्याया साठी, विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या लढ्याला अधिक बळ देण्यासाठी सर्व मराठा बांधवांनी एकत्रित येण्याची गरज आहे.मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध प्रश्नांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला आवश्यक ती साथ जावळी तालुक्याने द्यावी तसेच मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी विविध योजना आहेत त्याचा लाभ विध्यार्थी यांनी घ्यावा.असे आवाहन जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी केले.

मराठा समाजासमोरील विविध प्रश्न, समाजासाठी असलेल्या योजना, तसेच मराठा समाजाच्या अस्तित्वाच्या लढ्याबाबत महासंघांचे तालुका अध्यक्ष सुनिल आण्णा धनावडे यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली .

यावेळी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्षा शिल्पाताई गोळे, राहुल पवार युवा संघटना जिल्हाध्यक्ष,जिल्हा उपाध्यक्ष ( जावळी विभाग ) अनिल करंदकर,जिल्हा उपाध्यक्ष ( महाबळेश्वर विभाग ) बजरंग चौधरी, जावळी तालुका अध्यक्ष सुनिल आण्णा धनावडे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष शेखर जाधव,   बजरंग वांगडे जिल्हा उपाध्यक्ष ( फलटण विभाग )   उपस्थीत होते 

अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्य, समाज संघटन आणि मराठा समाजाच्या हितासाठी भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. समाजातील मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा निर्धार सभेत व्यक्त करण्यात आला.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ( महाबळेश्वर विभाग ) बजरंग चौधरी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांना व्यापक पाठिंबा मिळावा आणि समाजाची ताकद एकजुटीने दाखवून देता यावी, यासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या सभेला मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

“एक मराठा, लाख मराठा” या भावनेतून समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन पुढील लढ्याची दिशा निश्चित करण्याची गरज आहे. आगामी काळात मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी संघटितपणे आणि शांततामय मार्गाने संघर्ष करण्याचा निर्धार उपस्थितांनी केला.

सदर कार्यक्रमास  छत्रपती संघटनेचे जावळी तालुका उपाध्यक्ष अनिल केसकर, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत गोळे ,पत्रकार मोहन खुडे , युवा संघटनेचे जावळी तालुका उपाध्यक्ष संकेत जुनघरे,रिटकवली चे माजी उपसरपंच सर्जेराव मर्ढेकर,महेश मर्ढेकर,उपसरपंच बळीराम  मर्ढेकर,नामदेव गेणु मर्ढेकर, जोतीराम  चव्हाण,गणेश गुळंबे,सुरेश मर्ढेकर,सुनिता मर्ढेकर महिला मंडळ अध्यक्ष,रंजना मर्ढेकर, रंजना ज्ञानेश्वर मर्ढेकर,अक्षय दुदंळे,युवा, युवती मोठ्या संख्येने उपस्थीत होते.उपस्थिताचे स्वागत नामदेव मर्ढेकर यांनी केले आभार उपसरपंच बळीराम मर्ढेकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button