Uncategorized

खेडच्या तलाठ्याविरोधात जनहित संघर्ष सेना आक्रमक; भ्रष्टाचार अन् अनियमिततेच्या चौकशीसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा!

खेडच्या तलाठ्याविरोधात जनहित संघर्ष सेना आक्रमक; भ्रष्टाचार अन् अनियमिततेच्या चौकशीसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा!

सातारा / प्रतिनिधी

मौजे खेड (ता. जि. सातारा) येथील तलाठी श्री. संदीप संपत वणवे यांच्या कथित गैरव्यवहार, महसूल नोंदींमधील अनियमितता आणि बेहिशोबी मालमत्तेची स्वतंत्र तसेच निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ‘जनहित संघर्ष सेने’च्या वतीने करण्यात आली आहे.

​याबाबत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खेड येथील महसुली कारभारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व अनियमितता झाली असून, संबंधित तलाठ्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास जनहित संघर्ष सेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जनहित संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथभाऊ शिंदे यांनी दिला आहे.

​तलाठी कार्यालयातील भ्रष्टाचाराविरोधात संघटनेने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे खेड परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button