वाई येथे बेकायदेशीर कत्तल करून गोसदृश मांस विकणाऱ्यावर गुन्हा दाखल.

वाई येथे बेकायदेशीर कत्तल करून गोसदृश मांस विकणाऱ्यावर गुन्हा दाख
वाई (प्रतिनिधी):
स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे व विनापरवाना प्राण्यांची कत्तल करून गोसदृश मांसाची विक्री करणाऱ्या एका इसमावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४:१५ वाजण्याच्या सुमारास रविवार पेठ, वाई येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी समि अहमद अन्सार चौधरी (रा. २०८८, रविवार पेठ, वाई, जि. सातारा) हा आपल्या राहत्या घराच्या पुढच्या खोलीत कोणत्याही परवान्याशिवाय प्राण्यांची कत्तल करून गोसदृश मांसाची विक्री करत असताना आढळून आला.
याप्रकरणी अभय धनंजय शिंदे (वय २२, रा. सिद्धनाथवाडी, वाई) यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून वाई पोलिसांनी आरोपी समि चौधरी याच्यावर ‘महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६’ च्या कलम ५(सी) आणि ९(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे (गुन्हा रजि. नं. २३४/२०२६).
या प्रकरणाची नोंद महिला पोलीस अंमलदार शेंडे (बॅच नं. ६२३) यांनी केली असून, पुढील अधिक तपास पोलीस अंमलदार पाटणकर (बॅच नं. ९२०) करत आहेत.



