आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिसांकडून आगमन व विसर्जन मार्गांची पाहणी; पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिसांकडून आगमन व विसर्जन मार्गांची पाहणी; पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्
आगामी १४ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आतापासूनच पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज, २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.०० ते ७.३० च्या सुमारास गणेशोत्सवातील आगमन आणि विसर्जन मार्गांची विशेष पाहणी करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यामध्ये गोपनीय विभाग अंमलदार, पायी पेट्रोलिंग अंमलदार आणि गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी केली. गणेशोत्सवादरम्यान निघणाऱ्या आगमन व विसर्जन मिरवणुकांच्या मुख्य मार्गांवर केंद्रित करून हा रूट मार्च काढण्यात आला होता.

या प्रमुख चौक व मार्गांची झाली पाहणी:
- देवी चौक
- मोती चौक
- राजवाडा
- गोलबाग
- शनिवार चौक
- बुधवार नाका
- विसर्जन तळे व परिसर
पाहणीदरम्यान मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची सद्यस्थिती, मंडळांच्या मिरवणुकांदरम्यान उद्भवू शकणाऱ्या संभाव्य अडचणी, वाहतूक कोंडी, सुरक्षेचे प्रश्न आणि गर्दीचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मिरवणुकीच्या काळात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात आणि कायदा-सुव्यवस्था कशी हाताळावी, याचे नियोजन या वेळी करण्यात आले. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाणे पूर्णपणे सज्ज असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



