सातारा तालुका पोलीस स्टेशन व निर्भया पोलीस पथकाच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रम
सातारा तालुका पोलीस स्टेशन व निर्भया पोलीस पथकाच्या संयुक्त विद्यमाने यशोदा कॉलेज व केंब्रिज इंग्लिश मिडीयम स्कूल येथे जनजागृती कार्यक्रम

विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर श्री. रंजन कुमार शर्मा साहेब, मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विपुल पाटील साहेब तसेच सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. निलेश तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस स्टेशन व निर्भया पोलीस पथकाच्या संयुक्त विद्यमाने यशोदा कॉलेज, सातारा व केंब्रिज इंग्लिश मिडीयम स्कूल, वाढे येथे अमली पदार्थ निर्मूलन, सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा व वाहतूक सुरक्षा या विषयांवर जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमास 360 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम, व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व, चांगली संगत, निरोगी जीवनशैली तसेच व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर सुरक्षा विषयावर मोबाईलचा सुरक्षित वापर, OTP, ATM PIN व बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, फेक प्रोफाइल, ऑनलाइन गेमिंग, डिजिटल अटक (Digital Arrest), QR Code फसवणूक, सायबर बुलिंग व ऑनलाइन आर्थिक फसवणूक यापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच कोणत्याही प्रकारची सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधून जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
महिला सुरक्षा विषयांतर्गत महिलांचा सन्मान, कायदेशीर हक्क, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, छेडछाड, स्टॉकिंग व ऑनलाइन ब्लॅकमेलिंग यांसारख्या प्रकारांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच डायल 112 व महिला हेल्पलाईन 1091 यांची माहिती देऊन आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलिसांची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले.

वाहतूक सुरक्षा विषयावर विद्यार्थ्यांना हेल्मेटचा वापर, सीट बेल्ट लावण्याचे महत्त्व, वाहतूक नियमांचे पालन, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, वेगमर्यादा पाळणे, मद्यपान करून वाहन न चालविणे तसेच अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. शेवटी सुरक्षित, सजग व जबाबदार नागरिक बनण्याची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमास जिल्हा समुपदेशक ज्योती जाधव, सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक प्रवीण वायदंडे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप फणसे, महिला पोलीस कॉन्स्टेबल मयुरी लोहार तसेच निर्भया पोलीस पथकाचे पोलीस नाईक विक्रम पिसाळ, पोलीस कॉन्स्टेबल मयुरेश नवगण आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल गडदे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पोलीस विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या जनजागृती उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करून अशा कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.



