Uncategorized

मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली शरद पवारांची भेटः ‘सिल्व्हर ओक’वर दोघांत चर्चा, जिल्हा सहकारी बँकेच्या वर्तुळात खळबळ.

मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली शरद पवारांची भेटः ‘सिल्व्हर ओक’वर दोघांत चर्चा, जिल्हा सहकारी बँकेच्या वर्तुळात खळबळ

सातारा जिल्हा बँकेचे पहिले अध्यक्ष लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांचे नातू आणि राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंनी ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्याने सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. शंभूराज देसाई पहिल्यांदाच ‘सिल्व्हर ओक’वर गेले आहेत. त्यामुळे पवार-देसाई यांच्या भेटीकडे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने पाहिले जात आहे.

महायुतीतच्या सरकारमध्ये पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या शंभूराज देसाईंनी गुरुवारी शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती, असं म्हटलं जात असलं तरी सातारा जिल्ह्यात सध्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असल्याने ही भेट मोसमी होती, हे उघडच आहे. या भेटीत शंभूराज देसाईंनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनावरील ‘दौलत’ हे पुस्तक शरद पवार यांना भेट दिले.

‘पवार साहेबांनी लोकनेत्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा म्हणजे माझ्यासाठी केवळ संवाद नव्हता, तर एका समृद्ध राजकीय परंपरेचा आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा अनुभव होता’, असे शंभूराज देसाईंनी या भेटीबद्दल म्हटले आहे. मात्र, या भेटीवेळी दोघांमध्ये चर्चा देखील झाली आहे. त्याचा तपशील समजू शकलेला नाही. मात्र, या भेटीमुळे सातारा जिल्ह्यात आणि विशेषतः पाटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात जणू भूकंपच झाला आहे.

पाटणमध्ये 1997 मध्ये लोकनेते शंभूराज देसाई यांचा झालेला शिवसेना पक्ष प्रवेश हा राज्यात गाजला होता. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मरळी कारखान्यावर लाल दिव्याची गाडी घेऊन आले होते. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले सहकार परिषदेचे अध्यक्षपदही शंभूराज देसाईंना दिले होते. त्यानंतर दोन वर्षांनी काँग्रेस दुभंगली आणि शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता. त्यावेळी सातारा जिल्ह्यात सर्वप्रथम विक्रमसिंह पाटणकर हे शरद पवारांसोबत गेले होते.

शंभूराज देसाई आणि अजित पवार यांच्यात निखळ मैत्री होती. मात्र, शरद पवारांशी त्यांचे सूर कधीही जुळले नव्हते. विद्यमान परिस्थितीत शंभूराज देसाईंनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तीस वर्षे राजकारणात असूनही लोकनेत्यांच्या नातवाला जिल्हा बँकेत प्रवेश करता आला नाही. ही उणीव ‘पवार साहेबांनी लोकनेत्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा म्हणजे माझ्यासाठी केवळ संवाद नव्हता, तर एका समृद्ध राजकीय परंपरेचा आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा अनुभव होता’, असे शंभूराज देसाईंनी या भेटीबद्दल म्हटले आहे. मात्र, या भेटीवेळी दोघांमध्ये चर्चा देखील झाली आहे. त्याचा तपशील समजू शकलेला नाही. मात्र, या भेटीमुळे सातारा जिल्ह्यात आणि विशेषतः पाटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात जणू भूकंपच झाला आहे.

पाटणमध्ये 1997 मध्ये लोकनेते शंभूराज देसाई यांचा झालेला शिवसेना पक्ष प्रवेश हा राज्यात गाजला होता. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मरळी कारखान्यावर लाल दिव्याची गाडी घेऊन आले होते. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले सहकार परिषदेचे अध्यक्षपदही शंभूराज देसाईंना दिले होते. त्यानंतर दोन वर्षांनी काँग्रेस दुभंगली आणि शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता. त्यावेळी सातारा जिल्ह्यात सर्वप्रथम विक्रमसिंह पाटणकर हे शरद पवारांसोबत गेले होते.

शंभूराज देसाई आणि अजित पवार यांच्यात निखळ मैत्री होती. मात्र, शरद पवारांशी त्यांचे सूर कधीही जुळले नव्हते. विद्यमान परिस्थितीत शंभूराज देसाईंनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तीस वर्षे राजकारणात असूनही लोकनेत्यांच्या नातवाला जिल्हा बँकेत प्रवेश करता आला नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी शंभूराज देसाईंनी कंबर कसली आहे आणि जय्यत तयारी देखील केली आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नंतर दीर्घ काळाने शंभूराज देसाईंना जिल्हा बँकेत एन्ट्री करण्याची संधी आली आहे. पाटण तालुका सोसायटी मतदार संघातून त्यांनी जोरदार तयारी केली आहे. शरद पवारांचे कट्टर समर्थक विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजितसिंह पाटणकर हे राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपवासी झाल्यानंतर शंभूराज देसाईंनी ‘सिल्व्हर ओक’वर जाणे, ही राजकीय वर्तुळात मोठी घडामोड ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button