छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे निर्भया पोलीस पथकाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात
छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे निर्भया पोलीस पथकाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात.

सातारा, दि. 06/08/2026 : महाराष्ट्र पोलीस दलाच्या जनजागृती मोहिमेअंतर्गत छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे अमली पदार्थ निर्मूलन, सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा व वाहतूक सुरक्षा या विषयांवर जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रम मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर श्री. रंजन कुमार शर्मा साहेब, मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर मॅडम तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विपुल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमामध्ये 267 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, महिला सुरक्षा, आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक 112, महिला हेल्पलाईन 1091, सायबर हेल्पलाईन 1930, तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास निर्भया पोलीस पथकाचे पोलीस नाईक विक्रम पिसाळ, पोलीस कॉन्स्टेबल मयुरेश नवगण, महिला पोलीस कॉन्स्टेबल गडदे तसेच सातारा शहर पोलीस स्टेशनच्या श्रेणी PSI अनभुले मॅडम व महिला पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड मॅडम उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.



