इतिहास महाराष्ट्राचा” राज्यस्तरीय स्पर्धेत गोकूळ प्राथमिक शाळेचे यश.

“इतिहास महाराष्ट्राचा” राज्यस्तरीय स्पर्धेत गोकूळ प्राथमिक शाळेचे यश मराठी बालनाट्य दिनाचे औचित्य साधत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न बालरंग भूमी परिषद, सातारा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इतिहास महाराष्ट्राचा ! या राज्यस्तरीय नाट्यछटा, पोवाडा, स्वगत, नृत्य आणि संगीत सादरीकरण स्पर्धेची प्राथमिक फेरी केसकर हॉल सातारा येथे संपन्न झाली.
इतिहास महाराष्ट्राचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी जीवन कार्यावर आधारित गोकूळ प्राथमिक शाळेतील हर्षवर्धन जाधव, ओवी भिसे व श्रवण भोसले यांनी उत्कृष्ट भाषण सादर केले.
यामध्ये हर्षवर्धन जाधव यांने केलेल्या उत्कृष्ट भाषणाने उपस्थितांची मने जिंकली या स्पर्धेमध्ये त्याचा द्वितीय क्रमांक आला. सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. शाळेच्या पदवीधर शिक्षिका सौ. वर्षालता धनावडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.शाखेच्या अध्यक्षा रसिका केसकर होत्या. कार्याध्यक्ष रेश्मा वाळिंबे यांनी परिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
सातारा जिल्हा बाल विकास समितीचे अध्यक्ष श्रीम. शकुंतला कासट उपाध्यक्ष श्री सागर प्रभाळे, सचिव श्री. विनोद कुलकर्णी सर्व संचालक मंडळ, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. निलम पाटील, मुख्याध्यापिका सौ. मिनल खटावकर, बालवाडी प्रमुख सौ. संध्या महामूलकर यांच्यासह पदवीधर शिक्षक सौ. वर्षालता धनावडे, श्री. रामदास चौगुले, श्रीम. सुवर्णा काळे, श्री. संजय सावंत, श्री. शशिकांत चव्हाण, सौ. चित्रा शिंदे, कु. जयश्री घेवदे सुनिता निकम व फुलाबाई अडागळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



