Uncategorized

चिंचणी गावच्या आई श्री वरदायनी देवीचा गोंधळ. “परंपरेने देवीचा गोंधळ उत्साहाने ग्रामस्थांनी केला साजरा.”

पारंपरिक श्रद्धा आणि उत्साह! चिंचणी ग्रामस्थांनी साजरा केला वरदायनी देवीचा गोंधळ.

रंगतारा प्रतिनिधी : श्रीकांत गोळे

सातारा तालुक्यातील चिंचणी गावचे ग्रामदैवत आई श्री वरदायनी मातेचा गांव गोंधळ उत्साहाने साजरा करण्यात आला.चिंचणी गावची परंपरा ही आजही तरुणांनी कायम ठेवत.समजाला आणि पुढील युवा पिढीला कायम जागृत ठेवण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी एक संदेश दिला.दर वर्षी प्रमाणे आकाड महिन्यात परंपरेने चालत आलेली प्रथा म्हणजे प्रत्येक घरातील शिधा मंदिरात जमा करून वेगवेगळ्या सर्व प्रकारच्या डाळी आणि तांदूळ एकत्र करून त्याची आमटी, भात बनवला जातो आणि सायंकाळी पाच वाजता प्रत्येक घरातून दहा ज्वारीची भाकरी जमा करण्याचे आव्हान केले जाते.

संध्याकाळी सहा वाजता गावातील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत देवीचा गोंधळ प्रदिप जाधव (गोंधळी) यांच्या उपस्थितीत सुरू केला जातो.हा कार्यक्रम गावातील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ महिला मंडळ, श्री वरदायिनी माता तरुण मंडळचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहून मोठ्या उत्साहाने गोंधळ साजरा करण्यात आला. सायंकाळी सात वाजता गावातील सर्वांना महाप्रसाद भोजन करण्याचें आव्हान केले जाते. सर्व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित राहून जेवण वाढण्यचे काम मोठ्या उत्साहाने आनंदाने करतात.सर्वजण जेवणाचा आस्वाद घेतात. रात्री सांप्रदायीक भजन मंडळ चिंचणी यांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम सुरू केला जातो.आई श्री वरदायनी मातेचा आशिर्वाद सर्वांना राहुदेत..कार्यक्रमाच्या शेवटी हा गोंधळ सर्वांच्या सहभागाने आनंदमय वातावरनात पार पडला.सरपंच जितेंद्र सावंत यांनी ग्रामस्थांचे आणि कार्यकर्त्यांचे धन्यवाद आणि आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button