गोकूळ प्राथमिक शाळेतील ५१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप!
श्रीलक्ष्मीकेशव प्रतिष्ठान सातारातर्फे विद्यार्थ्यांमधील चांगल्या संस्कारांसाठी विविध उपक्रम

.शिक्षण,आरोग्य आणि सामाजिक विकासासाठी समर्पित संस्था श्रीलक्ष्मीकेशव प्रतिष्ठान सातारा यांचे मार्फत गोकूळ प्राथमिक शाळा कृष्णानगर, सातारा येथे साताऱ्यातील प्रसिद्ध आर्किटेक्ट श्री. चंद्रशेखर पवार यांच्या हस्ते गोकूळ प्राथमिक शाळेतील पाचवी ते सातवी मध्ये शिकणाऱ्या 51 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
श्री विजयराव पंडित हे श्रीलक्ष्मीकेशव प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष असून त्यांच्यामार्फत शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजावेत या हेतूने विविध उपक्रम राबविण्यात येतात. श्री रामदास चौगुले व संजय सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी गोकूळ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मिनल खटावकर, पदवीधर शिक्षिका सौ वर्षालता धनावडे, श्री. रामदास चौगुले श्रीम. सुवर्णा काळे, श्री. संजय सावंत, श्री. शशिकांत चव्हाण सौ चित्रा शिंदे व घेवदे मॅडम उपस्थित होत्या.
लक्ष्मी केशव प्रतिष्ठानच्या तनुजा कांबळे, नम्रता कुलकर्णी,दिपाली पवार व काठाळे काका उपस्थित होते.



