Uncategorized

ज्वेलर्स दुकानदारावर सावकारीचा गुन्हा; सहाय्यक निबंधकांची तक्रार, साताऱ्यात कारवाई

ज्वेलर्स दुकानदारावर सावकारीचा गुन्हा; सहाय्यक निबंधकांची तक्रार, साताऱ्यात कारवा

सातारा शहरात बेकायदेशीर सावकारीचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी शनिवार पेठ येथील एका ज्वेलर्स चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजेंद्रसिंह नरपतसिंहजी देवल (रा. शनिवार पेठ, सातारा) असे या ज्वेलर्स दुकानदाराचे नाव आहे. या प्रकरणात सहाय्यक निबंधक राहुल अशोकराव देशमुख (वय ४५, रा. सातारा) यांनी स्वतः शासनाच्या वतीने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार मार्च २०१६ ते जुलै २०१६ या कालावधीत घडला आहे. या प्रकरणातील मूळ तक्रारदार शरद राजेघोरपडे यांनी देवल याच्याकडून सोन्याचे दागिने गहाण ठेवून प्रति महिना २ टक्के व्याजाने २ लाख ४५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. देवल याने सावकारी व्यवसायातून हे कर्ज दिले असून, त्याने कर्जावर नियमापेक्षा जादा दराने व्याज व मुद्दल वसूल केल्याचा आरोप आहे. तसेच, आजअखेर देवल याने राजेघोरपडे यांच्या गहाण ठेवलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या आणि कानातले परत केले नसल्याचा तक्रार अर्ज त्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दिला होता.

या तक्रार अर्जाची दखल घेऊन जिल्हा निबंधक कार्यालयाने सखोल चौकशी केली असता त्यामध्ये तथ्य आढळून आले. त्यानंतर निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी देवल याच्या ज्वेलर्स दुकानाची झडती घेतली. या कारवाईदरम्यान, दुकानात बेकायदेशीर सावकारी प्रकरणाशी संबंधित काही डायऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती लागल्या. या पुराव्यांवरून अखेर शासनाच्या वतीने निबंधक कार्यालयाने सातारा शहर पोलीस ठाण्यात देवल याच्याविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button