तांत्रिक शिक्षणाला मिळणार नवी गती; डॉ. प्रमोद नाईक यांनी स्वीकारला तंत्रशिक्षण संचालकपदाचा कार्यभार
विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांना मिळणार बळ! डॉ. प्रमोद नाईक तंत्रशिक्षण संचालनालयाचे नवे प्र. संचालक

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या प्र. संचालकपदाची जबाबदारी डॉ. प्रमोद नाईक यांच्याकडे सोपविण्यात आल्या नंतर त्यांनी पदभार स्वीकारला. डॉ. नाईक यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील तांत्रिक शिक्षणाच्या गुणवत्तावृद्धीला, प्रवेश प्रक्रियेला, संस्थांच्या प्रशासनाला तसेच कौशल्याधारित शिक्षणाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, तांत्रिक शिक्षणातील नवकल्पना आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांनी व्यक्त केला आहे.
तसेच सर्व कर्मचारी वर्गामध्ये याबाबत आनंदाचे वातावरण आहे. यापूर्वी ते महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) तसेच तंत्रशिक्षण क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या प्रशासकीय जवाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत होते. यावेळी वर्ग-३ कर्मचारी संघटना व तंत्रसंघटन, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. श्याम शेवते तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. प्रमोद नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वाखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाची प्रगती होईल आणि कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय अधिक प्रभावीपणे घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



