सातारा–सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार.

सातारा–सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. धैर्यशील कदम यांची बहुमताने आमदारपदी निवड झाल्याबद्दल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज जलमंदिर पॅलेस येथे त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विधानपरिषद सदस्य म्हणून श्री. धैर्यशील कदम यांच्या माध्यमातून सातारा–सांगली जिल्ह्यांच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या यशस्वी व लोकाभिमुख कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कराड उत्तरचे आमदार श्री.मनोज घोरपडे, माजी जिल्हा परिषद सभापती श्री.सुनील काटकर, श्री.भिमराव पाटील,पंचायत समिती सभापती श्री.महेश गाडे, श्री.कुलदीप क्षीरसागर, श्री.विक्रमशील कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.किरण बर्गे, नगरसेवक श्री.पंकज चव्हाण, भाजप जिल्हा सरचिटणीस श्री.विठ्ठल बलशेटवार, श्री.धनंजय पाटील, श्री.विकास गोसावी, श्री.प्रविण शहाणे,श्री.सागर भोसले, श्री.पृथ्वीराज निकम, श्री.हिंदुराव पवार, श्री.विकास घोरपडे, श्री.संतोष घाडगे, श्री.समाधान घाडगे, श्री.भूषण देशमुख, श्री.शैलेश चव्हाण कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.



