प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कामगारांचा इशारा: साताऱ्यात द्वार सभा.

सातारा, दि. 22 जून: महाराष्ट्र एसटी संयुक्त कृती समिती, सातारा विभागाच्या वतीने प्रलंबित वेतनवाढ, महागाई भत्ता थकबाकीसह इतर आर्थिक मागण्यांसाठी आज सातारा विभागीय कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये ‘जवाब दो’ द्वार सभा घेण्यात आली. राज्यभरातील सर्व युनिटमध्ये एकाचवेळी बहुसंख्य कामगारांच्या उपस्थितीत आंदोलन झाले.
दुपारी 12:30 वाजता शेकडो कामगारांच्या अन्यायाविरोधी घोषणांनी परिसर दुमदुमला. आज होणाऱ्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीत सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न सोडवावेत, अन्यथा *29 जून 2026 पासून बेमुदत धरणे आंदोलन* छेडण्याचा इशारा देण्यात आला.
श्री. शिवाजीराव देशमुख साहेब बोलताना म्हणाले, “एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे, कॅशलेस मेडिक्लेम सुविधा द्या, 2016 पासून एकतर्फी कमी केलेला वेतनवाढीचा दर पुन्हा 3% करून वेतन निश्चिती करा, घरभाडे भत्ता 10%, 20%, 30% करून थकबाकी तातडीने अदा करा, महागाई भत्त्याची थकबाकी द्या. 4 श्रम संहिता व जनसुरक्षा अधिनियम 2024 महाराष्ट्रात लागू करू नये. लालपरीचे अस्तित्व टिकवण्यासाठी व कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी एस.टी. महामंडळासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करा. मध्यवर्ती कार्यशाळेतच चॅसीसचा पुरवठा करून स्वमालकीच्या बस बांधा. या मागण्या न सुटल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप आहे.”
श्री. सुहास जंगम यांनी विभागीय कार्यालयातील सर्व कर्मचारी बंधू-भगिनींना आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले व “संयुक्त कृती समिती आपल्याला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही” असे आश्वासन दिले.
श्री. ज्ञानेश्वर घोणे म्हणाले की, “कामगारांचे अनेक आर्थिक प्रश्न प्रलंबित आहेत. महागाई भत्ता व त्याचा फरक, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, स्व-मालकीच्या बसेस खरेदी कराव्यात.”
श्री. धनाजी जाधव यांनी सांगितले की, 2016 पासून एक टक्का इन्क्रिमेंट फरक सहित मिळावा, 58% महागाई भत्ता फारका सहित मिळावा, इथून पुढे कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येऊ आपली एकी दाखवू असे आहवान केले..
श्री.शेखर कोठावळे यांनी सांगितले की, कंत्राटीकरण रद्द करून कायमस्वरूपी नोकर भरती करण्यात यावी, कॅशलेस सुविधा तरी चालू करण्यात यावेत. जन सुरक्षा अधिनियम महाराष्ट्रात लागू करू नये अशी मागणी केली..
श्री. प्रकाश पाटील यांनी आजच्या बैठकीत काही निर्णय यावर 29 च्या आंदोलना बाबत निर्णय घेण्यात येईल, ते आंदोलन यापेक्षाही तीव्र स्वरूपात करण्याचे आवाहन केले,
आज द्वार सभेस उपस्थित असलेल्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींचे आभार मानले..
“आता माघार नाही” – कामगारांचा एल्गार
यावेळी _’महाराष्ट्र एसटी संयुक्त कृती समितीचा विजय असो’, ‘कामगार एकजुटीचा विजय असो’, ‘आमच्या मागण्या मान्य करा’_ अशा घोषणा देत आंदोलकांनी बसस्थानक परिसर दणाणून सोडला.निर्णय न झाल्यास 29 जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी उपस्थित: श्री. शिवाजीराव देशमुख, श्री. प्रकाश पाटील, श्री. ज्ञानेश्वर घोणे, श्री.शेखर कोठावळे श्री. महेंद्र साळुंखे, श्री.जनक जाधव श्री. गणेश निकम, श्री. पवन फाळके, श्री. धनाजी जाधव, श्री. सुहास जंगम, श्री. प्रणव सावंत, श्री. अभय वंजारी, श्री. आनंदा भोसले सावकार यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कामगार उपस्थित होते..



