Uncategorized

‘माझा निलेश कुठे आहे?’ — एकनाथ शिंदेंच्या या एका वाक्यात दिसली जिव्हाळ्याची नाळ.

सातारा : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे साताऱ्यातील निकटवर्तीय, शिवसेना शहरप्रमुख तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्कप्रमुख निलेश मोरे हे लंडनला रवाना होण्याच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे यांच्या भेटीस गेले. यावेळी शिंदे यांनी उपस्थितांमध्ये सहज विचारले, “माझा निलेश कुठे आहे? त्याचा उद्या वाढदिवस आहे.” आणि त्यानंतर निलेश मोरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.

राजकारणात हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांची गर्दी असते. मात्र त्या गर्दीतही ‘आपला माणूस’ कोण आहे, हे लक्षात ठेवणारे नेतृत्व मनाला स्पर्शून जाते. निलेश मोरे यांचा वाढदिवस लक्षात ठेवून स्वतःहून त्यांची विचारपूस करत शुभेच्छा देणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या या कृतीतून दोघांमधील जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

“माझा निलेश कुठे आहे?” हे अवघे चार शब्द… पण या चार शब्दांमध्ये पदापेक्षा मोठी असलेली आपुलकी, विश्वास आणि मायेची भावना दिसून आली. हजारो कार्यकर्त्यांमध्ये एखाद्याला नावाने हाक मारत त्याचा खास दिवस लक्षात ठेवणे, हीच खरी नेतृत्वाची ताकद आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या भावनिक नात्याची पावती म्हणावी लागेल.

लंडनच्या प्रवासाला निघण्यापूर्वी मिळालेल्या या खास शुभेच्छा निलेश मोरे यांच्यासाठी निश्चितच अविस्मरणीय ठरल्या. नेत्याच्या मनात ‘आपला माणूस’ म्हणून स्थान मिळवणे, यापेक्षा मोठी वाढदिवसाची भेट आणखी कोणती असू शकते?

एकनाथ शिंदे यांच्या या जिव्हाळ्याच्या शब्दांची आणि शुभेच्छांची चर्चा सध्या साताऱ्यातील शिवसैनिकांमध्येही होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button