Uncategorized
आदर्श कॉलनीचा रस्ता झाला चकाचक; उपसरपंच विकास देशमुख यांच्या प्रयत्नांना यश
आदर्श कॉलनीचा रस्ता झाला चकाचक; उपसरपंच विकास देशमुख यांच्या प्रयत्नांना यश

आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी ग्रामपंचायत क्षेत्रातील विकासकामांचा धडाका सुरू आहे. याच मालिकेतील एक भाग म्हणून, तामजाईनगर येथील आदर्श कॉलनीतील रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.
शाहूपुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मा. विकास देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून या कामाचा पाठपुरावा करण्यात आला होता. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने कॉलनीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. “लोकनेते शिवेंद्रसिंहराजे यांच्या आशीर्वादाने आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रभागातील पायाभूत सुविधांना आम्ही प्राधान्य देत आहोत,” असे यावेळी उपसरपंच विकास देशमुख यांनी सांगितले



