काम उपसरपंचांचे, ‘नूतन’ नगरसेवक गायबच! तामजाई नगरमधील धोकादायक खांब हटवण्यास सुरुवात; विकास देशमुखांचे कार्य वाखाणण्याजोगे.
"बोलघेवड्या नेत्यांपेक्षा कृतीशील लोकप्रतिनिधीच जनतेच्या हिताचे! तामजाई नगरमधील धोकादायक खांबांचा प्रश्न अखेर सुटला. उपसरपंचांचा दणका, पण नूतन नगरसेवक नेमके कुठे गायब आहेत?"

तामजाई नगर येथील रस्त्यावरील धोकादायक खांब, जे अपघाताला निमंत्रित देत होते, अखेर काढण्यास सुरुवात झाली आहे. शाहपुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच विकास देशमुख यांनी सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश आले असून, आज प्रत्यक्ष खांब काढण्याचे काम सुरू झाले आहे. याबद्दल विकास देशमुख यांनी नगराध्यक्षांचे आभार मानले.

या सकारात्मक घडामोडीमुळे एकीकडे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे, तर दुसरीकडे “आमचे नूतन नगरसेवक आहेत तरी कुठे?” हा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. ज्या भागात जनतेने विश्वासाने नगरसेवक निवडून दिले, ते नूतन नगरसेवक या अत्यंत गंभीर नागरी प्रश्नाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. एकीकडे उपसरपंच सक्रियपणे लोकांचे प्रश्न सोडवत आहेत, तर दुसरीकडे नगरसेवकांच्या या ‘बेपत्ता’ असण्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी “निवडणुकीपुरतेच दर्शन की काय?” असे विचारले असून, नगरसेवकांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



